आर्थिक भुकंप आणी आपण

सोमवार दिनांक 24 आॉगस्टची नोंद भारताच्या इतिहासात आर्थिक भुकंपाचा दिनांक म्हणून झाली . सध्याचा काळात ब्रम्हदेश उत्तर कोरीया सारख्या स्वत: जागतीक अर्थव्यवस्थेचा भाग न झालेल्या अर्थव्यवस्था जर सोडल्या तर जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेतील बदलाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परीणाम होणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे . अर्थात हा परीणाम कमी अधिक असेल पण परीणाम होणारच . त्याच प्रमाणे चिन मधील संकटाचा परीणाम आपल्यावर झाला . तशी त्याची चाहूल शुक्रवारी अमेरीकन अर्थव्यवस्थेत झालेल्या पडझडी नंतर आलीच होती . सध्या जागतीक सर्व अर्थव्यवस्था या एकमेकांना लागुन राहिलेल्या आहेत . जसे एका मोठ्या सायकल स्टँडमध्ये एकमेकांना अत्यंत चिकटून सायकली उभा केलेल्या आहेत अचानक काही कारणाने एका कोपर्यातील सायकल पडते . तीचा धक्का लागून दूसरी आणी दूसरीचा धक्का लागून तिसरी असे चक्र सूरू रहाते . तसेच काहीसे या एकमेकांत गुंतलेल्या अर्थव्यवस्थेचे असते . आपल्या रिझर्व बँकेचे गव्हर्न रघूराम राजन यांच्या आपल्याला फारशा धोका नाही या मताशी मी सहमत आहे . 2008 साली यूनाटेड स्टेट आॉफ अमेरीका येथील सबसप्राइम क्राईसेस किंवा त्यानंतर आलेल्या अरब देशातील मंदीचा आपल्यावर काय परीणाम झाला होता ? . अर्थात यासाठी मी सध्याचा राज्यकर्तांपेक्षा इंदिरा गांधीनी जे बँकेचे सरकारीकरण केले त्याला श्रेय देईल . त्यामुळे आपली जी मजबूत अर्थव्यवस्था उभी राहिली त्या मुळे हे शक्य झाले हे विसरता येणार नाही . तसेच भारतीयांची बचतीची सवय कारणीभूत आहे किंवा भारतीय सोने किंवा जमिनीत ज्या सहजतेने पैसा गुंतवतात त्याला देइल . भारतीयांच्या शेअर मार्केटमध्ये कमी गुंतवणूक करण्याला देइल . नक्की अन्य गोष्टींना . माञ यामुळे कदाचित इतर देशांनी भारतात पैसा न गुंतवल्याने मेकिंग इंडीया या मोहिमेला खिळ बसू शकते .अथवा दूसर्या महायूध्दानंतर यूरोपीय देश कंगाल झाल्यावर स्वत: चे उत्पादन विकून यूनाटेड स्टेटस आँफ अमेरीका जागतीक महासत्ता बनला . तसेच भारत स्वत: चा श्रम शक्तीवर भर देवून प्रचंड उत्पादन करु शकतो माञ त्यासाठी जमिनी चा गुंता सोडवायला लागेल . शेतीत उत्पादन वाढवावे लागेल किंवा भविष्याचा सम्रुध्दीसाठी काही काळ उपाशी रहावे लागेल . माञ यातून जग सुटेलच 1930 च्या महामंदीतून जग सुटले ना !आशीयाई वाघ म्हणून गणना देशांची अर्थात आशियान मधील देशांच्या अर्थव्यवस्थेचा या बाबत आपण अभ्यास केला पाहीजे त्यांचा उदय अस्त आणी पुर्नप्रारंभ यासाठी अभ्यासला पाहीजे . तर या अभ्यासाठी सध्या थांबतो
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?