बंदी वर घाला बंदी

सर्वप्रथम 3आॉगस्ट 2015 ला इंदोरच्या लोकप्रतिनिधींनी विरोधकांसाठी उचललेल्या पावलाचा निषेध . विरोध मोडून काढण्याची ही योग्य पध्दत नाही असो 
नुकतीच केंद्र सरकारने काही संकेतस्थळे बंद केली . जे अत्यंत अयोग्य असल्याचे मला वाटते , सरकारने लवकरात लवकर ही बंदी उठवायला पाहिजे .माझ्या मते हा लोकांचा सदसदविवेकबुध्दीवर झालेला आघात आहे . लोकांना काय वाईट काय चांगले याची पुरेपुर जाण असते "ये जो पल्बीक है सब जानती अजी ये जो पल्बीक है " हे राजेश खन्ना यांचवर चिञीत झालेल्या
गाण्याचे बोल अतिशय खरे आहेत . सरकारने एखाद्या गोष्टीला विरोध करू नये जर लोकांना वाटले की एखादी गोष्ट करावी सरकारने ती करू द्यावी जर लोकाना एखादी गोष्ट करू नये असे वाटले तर ते करण्याची सक्ती सरकारने करू नये काय करावे अथवा काय करू नये व्यक्तीने स्वत;च्या सदसदविवेक बुध्दीने घेणे अतिशय योग्य असते असे मला वाटते मद्यप्राशन करणे आरोग्याला अपायकारक आहे हे व्यक्तीला वाटले तर ते स्वत: हून मद्य प्राशन करणे थांबवतील . मग प्रशासनाने त्यास मद्यप्राशनाची सक्ती केली तरी त्यास लोक मद्यप्राशन करणार नाहीत . सरकारला जर बंदी आणायचीच असेल तर या विविध गोष्टीवर बंदी घालण्याचा प्रकारावर बंदी घालावी . असे माझे प्रामाणीक मत आहे . माञ यामध्ये जर एका विशिष्ट समाज घटकावर अन्याय होत असेल तर सरकारने हस्तक्षेप केलाच पाहीजे . याचा अपवाद वगळता सरकारने समाजावर कोणतेही बंधने टाकायला नको .सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचा काळात नागरीकांवर प्रचंड बंधने होती . याउलट युनाटेड स्टेटस आँफ अमेरीका (हे विशेषनाम आहे त्यामुळे त्याचे संयूक्त संस्थाने अमेरीका असे भाषांतर होणे बरोबर नाही असे मला वाटते ) मध्ये अशी बंधने नसल्याने त्यांनी केलेली प्रगती आपण बघतोच म्हणजेच प्रगती होण्यासाठी बंधनमुक्त समाज असणे आवश्यक आहे . मानसशास्ञाचा ज्याचा थोडाफार अभ्यास असेल त्याला हे माहीती असेलच की एखादी गोष्ट नाही सांगीतली की तीच गोष्ट करण्याची मानवी प्रव्रुती असते अश्यावेळी सामान्य स्थितीत जी व्यक्ती असे काम करायला धजावणार नाही अशी व्यक्ती पण ते काम करते . एकप्रकारे बंदी म्हणजे छूपे समर्थनच असते . त्यामुळे बंदीमुळे ती गोष्ट समाजातून हद्दपार होते असे नाही . माञ ती उघड पणे न करता छुप्या नावाने संकेताची भाषा वापरून सुरुच रहाते .हा आजवरचा इतीहास आहे . राहीली गोष्ट संकेतस्थळे बंद करण्याची. ती बंद केली असली तरी नवी त्या प्रकारची संकेतस्थळे निर्माण होणारच नाही हे कशावरुन ? आज संकेतस्थळ तयार करणे हा काही व्यक्तीचा डाव्या हाताचा मळ आहे . सबब बंदी हे या प्रश्नाचे ऊत्तर नाही तर लोकांना असे संकेतस्थळ बघण्याची ईच्छाच होणार नाही अशी तजवीज करणे योग्य नाही का ? तसे यावर खुप काही बोलता येइल पण माझ्या पोस्टची वेळ बघितलकयावर तूम्हाला समजेल आता मध्यराञ उलटून गेलीये . तर सध्यापूरते थांबतो . पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?