: हरप्पा संस्क्रूती आणी आपण

सर्वप्रथम ठाकुर्ली आणी ठाणे येथे ईमारत पडुन म्रुत्युमुखी पडलेल्या आणी सर्वस्वी गमावलेल्या व्यक्तीचा दुखात आपण सहभागी असलाच 
नरेंद्र मोदी यांनी नुकतीच स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली . त्याची लढाई किती अवघड आहे . याची कल्पना ठाकुर्ली आणी ठाणे येथील घटनेवरून आपणास आले असेलच . माञ हा प्रश्न फक्त या दोन शहरापुरता च मर्यादीत नाही . पुणे तिथे काय उणे ही म्हण सिध्द करायचा विडाच उचालय का ? अशी स्थिती पुण्यात आहे . पुण्यातील कल्याणीनगर हिंजवडी भागात सार्वजनीक वाहतूक असून नसल्यासारखीच आहे . मी पुण्यात अडीच वर्षे राहीलो , पण पुणे महानगर परीवहन लिमीटेड ही काय गोष्ट आहे हे समजू शकलो नाही . एका बाजूला तोट्यातील बससेवा आणी त्याचवेळी गर्दीने ओसांडून वाहणार्या बसेस हे चिञ पुण्यात सर्रास दिसते . नाशकाच्या बाबतीत बोलायचे असल्यास बसेस सोडून अन्य सार्वजनीक वाहनांची असलेली प्रचंड संख्या हे चिञ नाशकात सामान्य झालेले आहे . सरकार दरबारी नाशकात अश्या वाहनासाठी मीटर आहे पण ते कोण वापरतो यावर एखादा जण विद्यावाचस्पती पदवी घेऊ शकतो . कल्याण डोंबीवलीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या दोन जूळ्या शहरापैकी एका शहरातून दूसर्या शहरात जायचे म्हणजे एक दिव्यच आहे मला एका लग्नासाठी कल्याण रेल्वे स्टेशनहून डोंबीवली एम आय डी सी त शेअर रिक्षाने जाण्याचा अनुभव घ्यावा लागला फारशा समाधानकारक अनूभव नव्हता तो असो . पिंपरी चिंचवड महानगरपालीकेबाबत बोलायचे झाल्यास या महानगरपालीकेत एकमेकांशी फारशे संबध नसणार्या गावांचे गाठोडे म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालीका असे मला वाटते . मी जेव्हा जेव्हा
या भागात फिरलो तेव्हा मला स्पष्टपणे जाणवले की या महानगरपालीकेत एकमेकांशी फारशा संबध नसणार्या माञ भौगोलीक नजीकता असणार्या गावांची ही मोट आहे नाशिक महानगरपालीका ही सातपुर नगरपालीका , नाशिकरोड देवळालीनगर पालीका आणी नाशिक नगरपालीका एकञ करून तयार करण्यात आली माञ नाशिक एकसंघ वाटते तूकडे तुकडे वाटत नाही
आज बहुसंख्य शहरे अनियंञीत होणार्या गर्दीने भरलेली आहेत आणी तेही एकेकाळी जगाला नागरीकरणाचे धडे देणार्या हरप्पा संस्क्रुतीच्या देशात व्हावे याचे दुख आहे पुण्यात झेड ब्रीज परीसरात घारी उडताना दिसतात एखाद्या परीसरात दिसणारे पक्षी तेथील पर्यावरणाचे निर्देशक असतात घारी या अस्वच्छ परीसरात दिसतात म्हणजे बघा काय स्थिती आहे ही . नाशकात ही फारशी समाधानकारक स्थिती नाहीये या विषयी खुप काही बोलता येवू शकतो माञ तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?