मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर


काही व्यक्तीचे जरी नाव उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात मान अभिमानाने ताठ होते छाती ताठ होते छञपती शिवाजी महाराज स्वातंञ्यवीर सावरकर ही काही त्यातील काही नावे
स्वातंञ्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते
समाजसुधारक विज्ञाननिष्ट भाषातज्ञ ऊक्रूष्ट संघटक प्रखर देशभक्त समयसुचक सिध्दहस्त लेखक भविष्यसूचक बलोपासक त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ञुषीतुल्य व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्याचातील समाज सुधारक होय
अंदमानातील त्या छळछावणीतून सुटल्यावर रत्नागिरीत (ज्या रत्नागिरीत ब्रिटीशांनी ब्रम्हदेशातील राज्याला तुरंगात ठेवले होते ) सावरकरांना स्थानबध्दतेत ठेवले होते त्या वेळेस त्यांनी मानवतेचे महान मंदिर असे ज्याला म्हणता येइल असे पतितपावन मंदिर उभारले थी त्यांचा समाजसुधारणेची सुरवात होती त्यानंतर त्यांनी समाजातील जाती प्रथेवर प्रचंड प्रमाणात आसूड ओढले माझ्या माहितीतील तरी डॉ बाबा साहेब आंबेडकरांनंतर स्वातंञ्यवीर सावरकर एकमेव क्रांतीकारक आहे ज्यांनी समाजसूधारणेला पण महत्व दिले लोकमान्य टिळकांचा समाजसुधारणेवरून गोपाळ गणेश आगरकरांशी झालेले मतभेद जग जाहीर आहेच महात्मा फुले यांनी समाज सुधारणेला प्रचंड पाठबळ दिले पण त्यांची राष्टीय सभेविषयक मते प्रतिकूल होती माञ सक्रीय राजकारणात राहून समाजसुधारणा करणारे स्वातंञ्यवीर म्हणूनच ईतरांपेक्षा उजवे ठरतात
त्यांचे संघटन कौशल्यपण वाखण्याजोगे होते मिञमेळा पुढे ज्याचे अभिनव भारत असे नामकरण करण्यात आले ते उभारताना असो किंवा पुढे हिंदू महासभेचे कार्य करताना आपल्याला त्यांचातील उत्क्रुष्ट संघटक सहज दिसतो
विज्ञानप्रेम हा सुध्दा त्याचातील मला विशेष भावलेला गुण आहे प्रखर धर्मप्रेमी असूनही धर्मातील अनिष्ट चालीरीतीवर हल्ला चालवणारे समाजाने आता विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सागणारे सावरकर खरोखर महान व्यक्तीमत्व होते गाय उपयुक्त पशू आहे मानवाने तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे किंवा माझा निधनानंतर माझे कोणतेही क्रियाक्रम करू नये असे म्रुत्यूपञात सांगणारे सावरकर मला त्यामुळे अधिकच वंदनीय ठरतात सावरकर म्हणजे हिंदूत्व असा संकुचित अर्थ घेणार्यांनी सावकरांचा या विचाराचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे दोन वर्षापूर्वी नाशकात अंतरराष्टीय स्वातंञ्यवीर सावरकर संमेलन झाले त्यात आलेला माझा अनुभव सांगून आपली या पोस्ट पूरती विस्तार भयास्तव रजा घेतो स्वातंञ्यवीर सावरकर फेसबुक च्या एका पोस्ट मध्ये आवाक्यात येणारा विषयच नाही असो तर अनुभव असा आहे की
या संमेलनात हिंदूत्व या विषयावर वक्त्यांचे विचार ऐकायला सभामंडपाचा दिडपट गर्दी होती म्हणजे सभामंडपाची जर तीनशे लोकांची क्षमता असेल तर साडेचारशे लोक आले होते माञ हिंदूत्व हा विषय संपल्यावर लगेच पाच मिनीटांनी विज्ञाननिष्ट सावरकर या विषयावर वक्ते आपले विचार मांडणार होते माञ त्यासाठी फक्त सत्तर ऐंशी लोक उपस्थित होते (आकड्याचा खरेपणावर बोलण्यापेक्षा मुद्दा समजून घ्यावा ही विनंती मि सभामंडपातील लोक मोजलेले नाहीत पण एक अंदाज येण्यासाठीचे काल्पनिक आकडे वापरलेले आहेत लोक किती प्रमाणात कमी झाले याचाअंदाज येण्यासाठी ) जय स्वातंञ्यवीर सावरकर जय स्वातंञ्यवीर सावरकर जय स्वातंञ्यवीर सावरक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?