होय प्रेमप्रकरणामुळेच

केंद्रीय क्रुषीमंञी यांनी प्रेमप्रकरणामुळे आणी व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात ,असे विधान केले आहे .त्या विषयी इतर लोक संताप व्यक्त करत आहेत . पण माझ्या मते केंद्रीय क्रुषीमंञी योग्य तेच बोलले . शेतकरी प्रेमामुळेच आणी व्यसनाधीनतेमुळेच आत्महत्या करतो ,माञ शेतकर्याचे हे प्रेमप्रकरण काळ्या आईसी केलेले असते . कोणत्याही व्यक्तीशी केलेले नसते. आणी व्यसनाच म्हणाल तर जमीनीतुन धान्य पुरवण्याचे व्यसन त्याला असते . आपले धान्य पुरवण्याचे व्यसन न करता आल्याने शेतकरी आत्महत्या करतो . तसे केंद्रीय मंञ्यांनी असे बोलण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाहिये , मागे लोकांनी नैसर्गिक विधी केल्याने उत्तराखंडाचे संकट आल्याचे विधान त्यांनी केले होतेच .असो आपल्या भारतात लोकशाही आहे . कोणी काहिही बोलू शकतो . तर सांगायचा मुद्दा अशा की आपल्या संविधानात कायद्याचा विषयांची विभागणी तीन भागात केली आहे . संघसुची तील विषयावर फक्त केद्र सरकार करू शकते, राज्यसुची वर राज्यसरकार कायदा करू शकते (अपवाद दिल्ली चा दिल्लीतील राज्य सरकार राज्यसुचीतील काही विषयावर कायदे करू शकत नाही , परीणामी केजरीवाल आणी नजीब जंग यांच्यात ढुसुम ढुसुम होते ) केंद्र आणी राज्य सरकार दोघेही ज्यावर कायदा करू शकतात त्याला समवर्ती सुची म्हणतात शेती हा विषय हा समवर्ती सुचीत आहे (आपली घटना तयार करताना घटना समितीत झालेली चर्चा डब्ल्यु डब्ल्यू डब्ल्य डॉट राज्यसभा डॉट एन आय सी डॉट ईन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे माञ ती कोणत्या भागात आहे ते मला माहीती नाहीये ज्यांना माहीती असेल त्यांनी क्रुपया कोणतेही आढेवेधे न घेता सांगावे अशी विनंती म्हणजे काय विचार करून घटना कर्त्यांनी हा निर्णय घेतला ते कळू शकते माझ्या मते शेती विषय समवर्ती सुचीत नको अर्थात तुमचे मत भिन्न असू शकते ज्याचे मी स्वागतच करतो ) आणी घोडे पेंड खाते ते येथेच . शेतीमध्ये काय पिकवायचे हे ठरवले जाते राज्य सरकारा मार्फत माञ देशातील
अन्नधान्याची निर्यात करायची की नाही ? केल्यास कधी करायचे ? किती करायचे ? या बाबत सर्व निर्णय घेतले जातात . या बाबत केंद्रात आणी राज्यात भिन्न पक्षाची सरकारे असल्यास त्याबाबत राजकारण खेळले जाते म्हणजेच जाणून बजूून त्या विशिष्ट राज्यात सर्वाधिक आलेल्या पिकाला जागतीक मागणी कितीही असली तरी काहीतरी कारण काढून ती नाकारणे माञ यात भरडला जातो तो शेतकरी परीणामी त्याला एकतर दोर जवळ करावा लागतो किंवा किटकनाशकाची बाटली जवळ करावी लागते सध्या जागतीक स्तरावरच हवामानत प्रचंड प्रमाणात बदलत आहे त्यात बदल करणे माणसाला शक्य नाही माञ हे जे राजकारण टाळणे शक्य आहे हे टाळले तर कर्जमाफीचे शुलक्काष्ट कधीच संपेल असे मला वाटते अर्थात तुमचे मत यापेक्षा भिन्न असू शकते ज्याचे मी स्वागतच करतो यावर खुप काही बोलता येवू शकते माञ पुन्हा येण्यासाठी सध्या थांबतो तरी तो पर्यत रामराम
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?