मला भावलेले सावरकर भाग २

स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या भारतमातेचे असे एक सुपुञ होते कि ज्यांना स्वत:हून लोक स्वातंञ्यवीर म्हणत मला तरी जगात स्वातंञ्यवीर सावरकरांखरीच असा एकही व्यक्ती माहीती नाही की ज्याला लोक Liberty warrior or Independent warrior /Freedom warrior अश्या नावाने ओळखले जाते नाशिकजवळच्या भगुरचा या वीराची महती इथेच संपत नाही सावरकरांनी काय केले याच्या ऐवजी काय केले नाही असे विचार णे जास्त संयुक्तीक ठरेल त्यांनी भाषेबाबत कार्य केले त्यांनी सयमसुचकता म्हणजे काय ? ती कशी वापरतात याचा वस्तुपाठच घालून दिला
सिध्दहस्त लेखक म्हणजे काय याचा वस्तू पाठच जणु सावरकरांनी घालून दिला त्याचे लेखन मुलत: वाचले कि कळते एखाद्या भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय पलेदार शब्द लांबलचक वाक्य अश्या साजश्रुगारीत भाषेत लेखन करावेत ते सावरकरांनीच सध्या त्यांचे जे लेखन प्रसिध्द केले जाते ते बहुसंख्य वेळेस पुर्नलेखन केलेले साहित्य असते त्यांचे मुळ साहित्य जो वाचेल त्याची मराठी अम्रुताहूनी मधुर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे त्यांचे कमला हे मराठीतील माझ्या माहितीतील तरी एकमेव खंडकाव्य आहे मराठीतील सर्वोत्क्रुष्ट लेखक म्हणून भी तर त्याचेच नाव घेईल आणी अत्यंत हालपेष्टा सहन करत त्यांनी ही साहित्यरचना केली है विशेष
सावरकर यांनी मराठीला दिलेले योगदान पण खुप महत्वाचे आहे सध्या आपण सहजतेने वापरत असणारे कितीतरी शब्द हे मुळच्या इंग्रजी शब्दांना सावरकरांनी दिलेले मराठी शब्द आहेत हे आपणास जाणवत देखील नाही उदा संपादक संपादकीय वगैरे माञ इतिहासाची पुर्नरावत्ती होते असे म्हणतात हे खरे आहे याची जाणीव करुन देणारी भाषा म्हणजे मराठी होय असे तिचे सध्याचे स्वरूप असते सध्याची मराठी म्हणजे मराठी इंग्रजी यांचे कॉकटेल असते मला अनेकजण या कॉकटेल मध्येच लिहावे असे सुचवतात असो मला स्वातंञ्यवीर सावरकरानंतर एकच व्यक्ती आढळते ज्यांनी मराठीत शिरलेल्या अन्य भाषिक शब्दांना मराठी शब्द दिले ती म्हणजे छञपती शिवाजी महाराज त्यांनी मराठी वरील फारशीचा प्रभाव दूर केला होता तर स्वातंञ्यवीरांनी इंग्रजी भाषेवरील प्रभाव दूर केला स्वातंञ्यवीर सावरकर यांनी मराठीत आणलेले कित्येक शब्द माञ रूढ होवू शकले नाहीत हे दुर्दैव मान्य करायलाच हवे
सावरकर यांचे मोठेपण येथेच संपत नाही त्याचातील अजून एक मला आवडलेला गुण म्हणजे त्यांची समयसुचकता त्याचा आयुष्यात ती जागोजागी दिसते मग थी जगप्रसिध्द मार्सेलीस ची उडी असो किंवा त्यांनी दुसर्या महायुध्दाचा प्रसंगी तरुणांना केलेला उपदेश असो या आणी अश्या प्रत्येक प्रसंगी त्यांची समयसूचकताच दिसते
स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तूर्तास विस्तार भयास्तव इथेच थांबतो स्वातंञ्यवीर
सावरकर की जय स्वातंञ्यवीर सावरकर की जय स्वातंञ्यवीर सावरकर की जय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?