जागतिक वन दिवसाच्या निमित्याने मार्च २१, २०१६

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने
सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे .
मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो .
मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो
उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास असणार्या तळजाई पर्वती चर्तश्रुंगी आदि टेकड्यांवर  अद्याप असलेली वनराई या उलट स्थिती नाशकात आढळते नाशिकच्या सभोवतालच्या पांडवलेणी , चांभारलेणी , रामसेज किल्ला , फाशीच्या  डोंगर येथील तूरळक वनराई (माञ आता येथील परीस्थिती सूधारत आहे मी स्वत: फाशीच्या डोंगरावर वृक्षारोपण केलंय ) चटकनं नजरेत भरते या दोन्ही शहरातील वर उल्लेखलेल्या टेकड्यांवरून शहरात नजर टाकली तरी झाडांच्या संख्येतील फरक आपणास दिसतो . पुण्यात नाशिकच्या तूलनेत अधिक झाडे असल्याचे सहज लक्षात येते  यामुळे पुणे अधिक थंडगार वाटते .
जागतिक मान्यतेनूसार एकूण भु भागाच्या 33 % जमीन वनाच्छादित असणे पर्यावरणीय समतोलासाठी आवश्यक आहे  महाराष्ट्रात हे प्रमाण फक्त 17% आहे ज्यात महाराष्ट्राचा एकूण भुभागाच्या 33%असणार्या माञ एकूण जंगलामध्ये 90% वाटा असणार्या विदर्भाचा पण समावेश आहे   या 17% मध्ये सुध्दा सदाहरीत वनांचा समावेश कमी आहे . परीस्थिती अशीच राहिली तर वर्हाडी ठेचा आणि कोल्हापूरच्या रस्याचे रावणं पिठ्ठल्या सोबत एकञीत मिश्रण करून ते एखाद्या व्यक्तीस खायला दिले तर त्या व्यक्तीची जी स्थिती होईल ती समस्त समाजाची होईल यात शंकाच नाही पण मानवाला या धोक्याची जाणिव झाली आहे आणि मानव परिस्थीती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे ही समाधानाची बाब आहे
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?