लोणार मी बघीतलेले



आजच  दिनांक 20मार्च 2016 पञ नव्हे स्मार्ट मिञ असे घोषवाक्य असणार्या एका दैनिकात लोणार विषयक लेखन वाचले अन माझे मन  लोणारला केलेल्या सहली आठवायला लागले. मी आतापर्यत 4 ते5 वेळा लोणारला गेलोय . दर वेळी लोणारला काही बदल झालेले दिसले काहि बदल सकारात्मक होते , काहि नकारात्मक होते असो
मी इयत्ता आठवीत असताना सर्वप्रथम लोणारला गेलो . ते खगोल मंडळ या संस्थेमार्फत (ही पोस्ट वाचणार्रापैकी काहि लोकांना मी या संस्थेबरोबर सोमेश्वर धावत्या (धबधब्याचे छोटेरुप म्हणजे धावत्या  ) नाशिक  येथे केलेले आकाशदर्शन आठवू शकते ) नंतर परत एकदा याच संस्थेबरोबर गेलो . नंतर स्वतंञ ही गेलो .

लोणारला प्रसिध्द असणार्या मुख्य सरोवराबरोबर गणेश तळे आणि अंबर तळे ही दोन छोटी सरोवरे देखील आहेत . त्याचा निर्मितीकाळ देखील मुख्य सरोवराच्या समकालीन आहे . तसेच प्रचंड मँगेंटीक पॉवर असलेली की ज्यामुळे चुंबकीय सुई देखील विचलीत होते अशी हनुमानाची उत्तर दक्षीण अशी झोपलेली मुर्ती पण लोणारचे आकर्षण आहे या मुर्तीला उभे करणे सोडाच पुर्व पश्चीम देखील कोणी करु शकत नाही भारतात  असणार्या काहि गोष्टीचा प्रचंड पगड्यामुळे त्या मुर्तीला प्रचंड प्रमाणात शेदूर फासलेला मला दरवेळी आढळला . त्या बाबत संशोधन करणे आवश्यक आहे .
मुख्य विवराचा विचार केला असता आपणास सासु सूनेची विहीर , वाघ महादेव मंदिर , देवी मंदीर आणि इतर काहि मंदिरांना आदि स्थळाना आपण भेटी देवू शकतो .
सासू सुनेची विहीर मुख्य विवरातील पाणी अति प्रचंड प्रमाणात खारे आहे . पण या विवराला लागूनच एक विहीर आहे तिचे पाणी गोडे आहे . पण जवळच असलेल्या पाझर तलावाचा कृपेने विवरातील पाणी पातळी वाढल्याने विहीर  सरोवातील पाण्यात बुडाली आहे . तरी विहीर असलेल्या भागातील पाण्याचा पिएच ईतर भागातील पाण्यापेक्षा चांगला आहे हाच तो काय दिलासा
वाघ महादेव मंदिर  शिल्पकलेचा अत्यंत चांगला नमुना असलेल्या या मंदीर  आताआतापर्यत प्रचंड प्रमाणात अस्वच्छ होते . वटवाघूळांचा विष्टेचा वासाने ते अगदी भरुन गेलेले असायचे आता काही प्रमाणात स्वच्छता ठेवतात
देवी मंदिर : मुख्य विवर परीसरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणजे देवी मंदिर होय परीसरात जञा भरत असल्याने हा परीसर चांगला विकसीत आहे . अर्थात विकसीत भागाचे वरदान असलेला प्लँस्टीकच्या कचर्याचे येथे चांगले साम्राज आहे या मंदिराचे शुशोभीकरण करण्याचा नादात या चांगल्या मंदाराला आँइलपेंट देवून या मंदिराचे विदृरुपीकरण केल्याचे माझे मत आहे 
नाशिक पुणे आणि मुंबई या माझे लेखन सर्वाधिक संख्येने वाचणार्या भागातील हवामानाचा विचार केला असता जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यातील आणि फेब्रुवारीचा पहिल्या 15 दिवसातले हवामान अल्हादायक आहे .15फेब्रूवारीनंतर येथील भट्टी तापण्यास सुरवात होते . जानेवारीमध्ये येथे कोरड्या हवेची काहिसी ञासदायक थंडी असते
तसेच नाशिक पुणे मुंबई या भागातून येथे जाण्यासाठी औरंगाबाद हे चांगले ठिकाण आहे . येथून 60 किलोमीटरवर जालना हे शहर आहे तेथून 50 किमी वर आहे लोणार . लोणार जालना रस्त्यावरच छञपती शिवाजी महाराजांचे आजोळ  लखूजी जाधव याच्या  सिंदखेड राजा  या गावी एक भुइकोट किल्ला आहे . थोडी वेगळी वाट धरल्यास जवळच देवळगाव राजा येथे श्री बालाजीचे चांगले मंदिर आहे लोणार पासून पुढे  90 किलोमीटरवर श्रीक्षेञ शेगाव आहे   या लोणार पासून 30 किलोमीटरवर मेहेकर येथील बाबाचा आश्रम प्रसिध्द आहे . त्या आश्रमात अनेक व्याधीवर ऊपचार केला जातो .
लोणारला आताआतापर्यत राहण्याची फारशी उत्तम सोय नव्हती एक एम टी डि सी चे रेस्ट हाउस एक जैन बोर्डिंग हीच ती काय सोय होती . आता माञ चांगल्या सोई झाल्यात
मग कराल ना व्हिजीट लोणारला
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?