राजा हरिशचंद्र ते सैराट

भारतात भारतीयाने तयार केलेला चिञपट म्हणजे दादासाहेब फाळके यानी तयार केलेला चिञपट  राजा हरीशचंद्र हा होय . हा मुकपट 3मे 1913रोजी प्रदर्शीत झाला ती बॉलीवूडची सूरवात मानली जाते . हा चिञपट आणि या नंतरचे प्रभात चे चिञपट हे संस्कृतीप्रधान पुराणातील कथनकावर आधारीत होते . नंतर हिंदीचा प्रभावाखालील कौटोंबिक चिञपटाचा कालखंड सूरु झाला . मध्यंतरी तमाशा चिञपटांची पण लाट मराठी चिञपट सृष्टीत येवून गेली . जी आता टाईमपास सैराट आदी निव्वळ करमणूक प्रधान चिञपटांपर्यत येवून ठेपली आहे .

गेल्या 103  वर्षाचा आढावा घेतल्यास आपणास अजून एका बाबीकडे लक्ष द्यावेच लागते ते म्हणजे चिञपट निर्मितीचे बदलेले केंद्र . पुर्वी कोल्हापूर आदी ठिकाणी चालणारी चिञपट निर्मिती कालांतराने मुंबईत येवून स्थिरावली . सध्या नाशिक परिसरात चिञीकरण होत आहे
चिञपट तंज्ञाच्या अंगाने विचार करावयाचा झाल्यास पिस्टर कलर ते सध्याचे आधूनिक थ्री डी पर्यतचा विचार करावा लागतो  .दूर्देवाने माञ हिंदीत स्थिरावलेले हे तंञज्ञान अजूनही मराठीत वापरले गेले नाही . ज्या व्यक्तीने या मोठ्या व्यवसायाची मुर्तमेठ रोवली . त्या व्यक्तीच्या मातृभाषेबाबत अशी परीस्थिती असणे यापेक्षा दुर्देव ते काय ?  आवाजाच्या दृष्टीने मराठी माञ हिंदी शी स्पर्धा करत आहे . हिच ती काय समाधानाची गोष्ट ! आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

Ravindra Shivde म्हणाले…
सैराट हा चित्रपट केवळ करमणूकप्रधान नाही
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर ,

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?