जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य
फिरायला कोणाला आवडत नाही ? आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधी फिरायला गेलेला असतोच . कोणी धार्मिक दृष्टीने पुण्यसंचय करण्यसाठी  फिरतो . कोणी नविन अनुभव घेण्यासाठी फिरतो .कोणी स्वतःचे आरोग्य निरोगी राहावे , मन उठ्याहित राहावे म्हणून फिरतो . या विविध ऊद्देशातून त्याचे विविध प्रकार पडतात उदा वैद्यकीय पर्यटन , दुर्गभ्रमंती पर्यटन ,धार्मिक पर्यटन , यातीलच एक म्हणजे कृषी पर्यटन हा होय . याची जगात विविध भागात प्रकारे व्याख्या केली जाते .  या सर्व व्याख्यांचा सार काढल्यांस आपणास असे म्हणावे लागते की निसर्गासी साधात्म्य साधाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय
आपल्या भारतात जवळजवळ 65% भाग ग्रामीण आहे . आपल्या भारताची खरी ओळख होते ती ग्रामीण भागातून या ग्रामीण जिवनाची ओळख करुन घेण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन .. तर या ग्रामीण भारतासाठी केले जाणारे कृषी पर्यटन जगाला समजावे म्हणून एका विशेष मोहिमे अंतर्गत Agri Tourism  Development cooperation  ( ATDC )या संस्थेमार्फत ईसवी सन 2008पासून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक कृषी पर्यटन दिन . जो दरवर्षी 16 मी या दिवशी साजरा करण्यात येतो . जगाला कृषी पर्यटनाची ओळख व्हावी , त्याच प्रसार प्रचार होऊन अधिकाधिक लोकांनी या कडे आकर्षित होऊन पर्यावरण पूरक असणाऱ्या या व्यावासायाद्रारे लोकांनी त्यांची आर्थिक उन्नती साधावी हा या मागचा उद्देश आहे.
शेतीला जोड धंदा म्हणूनही या प्रकाराला कडे येऊ शकते . या कडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते . या दिवसी उत्कृष्ट farm house ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा सम्मान केला जातो . राष्ट्रीय पातळीवर त्यस गौरवण्यात येते .
शहरी जीवनाला खेड्याची ओळख व्हावी . त्यांची निसर्गासी असणारी नळ तुटू नये . यासाठी त्यना निसर्गासी बांधून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे कृषी पर्यटन . .या कृषी पर्यटनामध्ये पर्यटकाना निसर्गाच्या अनुभूतीसह आवश्यक  सेवा पुरवणे अपेक्षित असून सध्या निव्वळ याच कामासाठी वाहिलेल्या अनेक farm महाराष्ट्रात उदयास येत आहे. सरकारी कारणामुळे पिक पाण्याच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी या गोष्टीच्या अवल्माब केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो . या कडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. या उद्याग्यासाठी आवश्यक असणर्या मुलभूत गोष्टी अर्थात जमीन , शेती या गोष्ठी शेतकर्याकडे असतातातच . फक्त त्यांना लोकांना राहण्यासाठीची सोय करावी लागते .
नाशिक परिसरात अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वाईन उत्पादक क्षेत्रात याच खुबीने वापर केलेला आढळतो .. सध्या आपल्या भारतात हे क्षेत्र बाल्या अवस्थेत असले तरी पाश्चात्य  देशात त्याचा संपूर्ण पणे विकास झालेला दिसतो . तिथे हा व्यावसाई पूर्णपणे व्यावसाईक पद्धतीने चालवला जातो .आपल्या भारतात सध्या वैद्यकीय पर्यटन (medical tourism ) यापर्यटनाची शाक्षेची विशेष चर्चा होताना दिसते . धार्मिक स्थळांना भेटी  देणे अर्थात  धार्मिक पर्यटन आपल्याकडे पूर्वापार आहेच .त्यात एक वाढ म्हणून आपणास या क्षेत्राकडे बघता येते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?