जाने क्यू ?

आपला भारत हा अनेक अजीब गोष्टिने भरलेला देश आहे व्यक्ती हा पण यातीलच एक घटक काय एक एक सॉलिड स्वाभावाचा गोष्टी असतात !
मला एटीम मशीनच्या वेळेस आणी किराणा दुकानात हा प्रकार खुप वेळेस अनुभवयाला मिळतो लोक कसेही दूसर्याचा विचार न करता उभे असतात
पहिल्यांदा एटीम च्या विचार करू
मला अनेकदा एटीम पाशी हा अनूभव आला आहे इतरांना हा अनुभव न आलेला असल्यास त्यांनी स्वत:पुण्यवान समझावे
मी एटीम मधून पैसे काढताना बाहेर आल्यावर मला असे जाणवते की लोक अनेकदा दरवाज्यातच  उभे असतात जणू आतील व्यक्तीने उंच उडी मारुन बाहेर पडावे किवा त्या व्यक्ती हवेच्या असून सरळ चालत  गेले तर आपण त्या व्यक्तीमधून बाहेर पडू अशा या व्यक्तीचा समज का असतो कोण जाणे आतील व्यक्तीला बाहेर पण पडता येवू नये अश्या प्रकारे त्या त्या का उभे राहतात कोण जाणे इतरांना कदाचित चांगले अनूभव असतील माझा माञ या बाबतीत फारशा चांगला अनुभव नाही हे माञ नक्की

मला येणारा दुसरा ञासदायक अनुभव म्हणजे किराणा दुकानाच्या कांउटरपाशी तिथे एकाव्यक्तीचे काम असते माञ काही काम नसताना लोक झुंडीने उभे असतात की नव्या माणसाला खुप गर्दी वाटून त्याने बाजूला उभे रहावे त्यामुळे दूकानात फारशी गर्दी नसून काम होण्यास जास्त वेळ लागणे हेतर नित्यातेच
आपल्या भारतीय समाजाला समाज म्हणून काहीही शिस्त का नाही गाडी मागे अश्या प्रकारे गाडी लावणे की की आधीची गाडी काढणे म्हणजे मोठे दिव्य वाटते आणी कश्याही प्रकारे गाडी लावल्याने जिथे 100 गाड्या पार्क होवे शकतात तिथे जेमतेम 40/50,गाड्या पार्क होतात युरोपीय देशात सयुंक्त संस्थाने अमेरीका ज्या प्रकारची सामाजिक बाबतीत स्वयंशिस्त आढळते ती का आढळत नाही ? या विषयी खुप काही बोलण्या सारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?