फेसबुक वरचा डीपी आणी आपण सर्व /नावात खुप काही आहे

कालचीच गोष्ट आहे मी माझा मिञपरीवाराबरोबर बसलो होतो आमच्या कट्यावर एक नविन व्यक्ति आल्याने त्याचाशी फेसबुकवर मैञी करणे आलेच तशी करण्यासाठी आमच्यातील एका ने विचारले डिस्प्ले फोटो (डि पी ) तूमच्यात आहेना ते म्हणाले हो आमचा संवाद पुढे जाण्यासाठी मग भी म्हटले हे उत्तम आहे नाहीतर माझ्या एका मिञाचा डि पी वर गुरूदत्त चा फोटो आहे त्यावर आमच्या ग्रुपची प्रतिक्रिया सदर व्यक्ती खुप धार्मिक आहे अशी उमटू लागली म ला त्यांना सांगावे लागले की श्री गुरुदत्त चा ( ञीगुणात्मक ञैलोक्य दत्त ) फोटो नसून जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक गुरुदत्त यांचा फोटो आहे ज्यांचा नावावर प्यासा ,कागज के फूल, साहब बीबी और गुलाम , मिस्टर अँड मिसेस १९५५ सारखे चिञपट जमा आहेत 
हा किस्सा घडून गेल्यावर माझा मनात दोन प्रश्न उपस्थित होत आहेत
प्रश्न पहिला की शेक्सपियर ने जे म्हटले की नावात काय आहे ते खरेच आहे का ? माझ्या कट्यावर नावामुळे च गोधंळ झाला नावसाम्यामुळे गुरूदत्ताचा वेगळाच अर्थ घेण्यात आला म्हणजेच नावात काहितरी आहे याविषयी तुम्हाला काय वाटते
आ णी दुसरा प्रश्न जरी ती व्यक्ति आता जिवंत नसली तरी अश्या प्रसिध्द व्यक्तीचे फोटो डिस्प्ले फोटो म्हणून लावावे का ? जर स्वत:चा फोटो लावायचा नसल्यास ती जागा रिकामी सोडणे किंवा त्या जागी एखादे फूल वा

तझम गोष्टी ठेवाव्यात असे मला वाटते आपली आवडती व्यक्ति सांगायचे इतर अनेक उपाय आहेत जसे त्या व्यक्ति वर आधारीत ग्रुपवर सहभागी होणे किंवा सतत त्याच व्यक्ती विषयी पोस्ट करणे अर्थात कोणता डीपी ठेवायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे आणी वैयक्तिक प्रश्नात न पडणेच शहाणपणाचे असते याची देखील मला जाणीव आहे मी फक्त माझे मत मांडले मला कोणालाही दुखवासचा हेतू ना

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?