अजून किती बळी

ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आणी ज्येष्ठ ग्राहक संरक्षण क्षेञातील नेते बिंदुमाधव जोशी यांना विनम्र श्रध्दांजली
मुंबई मधील अग्नी प्रलयात म्रुत्युमुखी पडलेल्या व्यक्तीना विनम्र आंदरांजली
अजून किती वीर बापू गायधनी ?
मुंबईत शनिवारी गोकूळ या ईमारतीला सायंकाळी साडेचार ला मोठ्या प्रमाणात आग लागली जी विझवायला 11तास लागले यात वित्तहानी व जिवीतहानीपण झाली मी ज्या नाशकात बसून हे लिहीत आहे त्या नाशकात पण अनेक प्राणघातक आगी लागलेल्या आहेत किंबहूना नाशिकच्या अग्निशामक दलाचे नामकरण ज्या वीर बापू गायधनी यांचा नावाने आहे त्यांना सुध्दा वीरमरण अग्नी प्रलयामूळेच आले होते ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आग लागणे टाळता येणे अशक्यप्राय असले तरी जिवित हानी टाळणे शक्य आहे असे मला वाटते त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे असे मला वाटते
मुंबई मधील आग ज्या भागात लागली त्या भागात पिंपरी चिंचवड किंवा सध्या पुणे महानगरपालीकेत येवू घालणार्या गावांमध्ये गाजत असलेल्या अनधिक्रुत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता फक्त अरूंद रस्ते होते तरी जीवीतहानी झाली पिंपरी चिंचवड पुणे भागातील अनधीक्रुत बांधकामे नियमबाह्य बांधकामे कशी करावी ?याचे प्रात्याक्षीकासहीत शास्त्रोक्त शिक्षण देण्यासाठी उभारलेली विद्यापीठे आहे का अशे वाटावे अशी आहेत जिथे दोन टूव्हीलर एकाचवेळी शेजारुन गेल्या तरी त्या लोकांना गोल्ड मेडल द्यावे अशी स्थिती आहे प्राणहानी टाळण्यासाठी ही स्थिती बदलणे आवश्यक आहे माञ आपल्याकडे 1995 किंवा 2000 पर्यत च्या अनधिक्रूत बांधकामे अधिक्रूत करयचे यावर चर्चा झोडल्या जातात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या अश्या बांधकामाच्या मुद्दा निवडणूक मुद्दा होता त्यावर कार्यवाही करण्यार्या प्रशासकीय अधिकार्याला त्रास देण्याचा ईतीहास जगजाहिर आहेच त्यांनी पुणे महानगर परिवहन लिमिटेड या कंपनीच्या कामात सुधारणा आणण्याचा प्रयत्न पण केला असता त्याना दिल्लीश्वरांचे बोलणे आले आपल्याकडे होणारे हे प्रकार कधी थांबतील जर हे थांबले तर मुंबई सारख्या दुर्घटना पण थांबतील असे मला वाटते फायर आँडिक्ट नावाचा प्रकार आपल्याकडे फारशा गांभीर्याने न घेण्याचा प्रकार का वाटतो?आणी या आगी लागण्याची जी कारणे दिली जातात त्यामध्ये शॉटसर्कीट हे लाख दुखोंकी एक दवा है क्यू ना आजमाये च्या धर्तीवर खुप प्रसंगी दिले जाते ते सहज देता येण्यासारखे कारण आहे म्हणून देत असतील तर ठीक आहे माञआपल्या भारतातील ईलेक्टीक प्रणाली येव्हढी कमकुवत असेल तर ती बदलली पाहिजे स्वामी विवेकानंदानी भारतीयांना आवाहन केले होते की पुढील 100वर्षे तुमचे देव विसरा व एकच देव लक्षात घ्या तो म्हणजे आपली भारत माता होय त्याच धर्तीवर ईतर बाबी बंद फक्त ईलेक्टीक प्रणाली सुधारणे या गोष्टी कराव्यात असे मला वाटते त्याच प्रमाणे जी सिलेंडर असतात त्याची वेळोवेळी तपासणी झाली पाहीजे मी पुण्यात दोन वर्षापूर्वी मुदत संपलेली सिलेंडर भिंतीला टांगलेली बघीतली आहेत ज्याचा वापर किती होइल या बाबत मीतरी साशंक आहे बर सध्या मॉकड्रिल करतात त्यावर पण काही बंधने आणावीत असे मला वाटते नाहीतर कोल्हा आला रे या गोष्टीमध्ये सांगितल्या प्रमाने खरी दुर्घटना घडून सुध्दा हे मॉकड्रीलच आहे असे वाटून दुर्लक्ष होण्याचा धोका मला वाटतो या विषयी खुप बोलता येवू शकते माञ विस्तार भयास्तव इथेच थांबतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?