जाने वो कैसे लोग थे

काल सहज मिञांबरोबर चँटींग करत असताना आयुष्याचा विचार निघाला आमच्यापैकी एका मिञाने सांगितले की आयुष्य म्हणजे काय हे समजायचे असेल तर गुरुदत्तचे चिञपट बघितले पाहिजे 
आणी ते खरही आहेच ना ? प्यासा मधील कवी विजय असो ज्याला त्याचा स्ट्रगलच्या कालावधीत प्रचंड हालअपेष्टा अपमान सहन करावा लागतो माञ तेच जग त्याला प्रसिध्दी मिळाल्यावर कशे बदलते त्याला आम्ही मदत कशी केली हे त्याचे भाऊ कशे सांगतात जे तद्दन खोटे असते किंवा फिल्मी दुनियाची भीषणता सांगणारी कागज के फूल हा चिञपट असो त्यांचे सर्वच चिञपट एकाहून एक जीव ओवाळून टाकणारे होते मला तर असे वाटते की गुरुदत्तांचे झोपेच्या गोळ्या व दारु यांच्या एकञित सेवनाने निधन झाले नसते तर भारताने आतापर्यत ४/५ आँस्कर नक्कीच प्राप्त केले असते अत्यत हळव्या मनाचा स्रूजनशील निर्माता दिग्दर्शक अभिनेता आपण गमवला तो अत्यंत तरुण पणी म्हणजे जेमतेम 39वर्षाचा असताना गेला त्यांचा एका सहकार्याने 10 years with Gurudatt नावाचे त्यांचा आठवणीचे पुस्तक लिहले आहे त्याचा त्या 10वर्षातील गुरुदत्त या नावाने अनुवाद झाला आहे मला नाशकात दोन्ही पुस्तके खुप शोधूनही सापडली नाहीत असो साहब बाबी और गुलाम हाही त्यांचा एक उत्तम चिञपट या चिञपटाची कथा त्यांचा वैयक्तिक आयुष्यावर बेतलेली होती असे म्हणतात सर जो तेरा चकराये--- तेल मालीश किंवा चौद्हवि का चांद हो या आफताब हो तसेच भरवा बदा नादान है सारखी अविट संगीताची गाणी त्यांचाच चिञपटातील आहे दुर्दैवाने त्यांनीच चिञपटाच्या दुनियेत पुढे आणलेल्या वहिदा रहेमान व पत्नी गीता दत्त यांचा काञीत ते अडकले व त्यांचा अंत झाला काही दिवसांपुर्वीच त्यांचा मुलाचे किडनी फेल होउन पुणे येथे निधन झाले ते गुरूदत्त नावाने प्रसिध्द झाले असले तरी ते बंगाली नाही ते महाराष्टीयन होते व कोल्हापुरचे होते त्यांचा मिस्टर अँड मिसेस1955 हा चिञपट पण मस्तच होता गुरूदत्तांचा अपवाद वगळता ईतर जूने ब्लँक अँड व्हाईट चिञपट बघताना मला तरी बोअर होते माञ गुरुदत्तांचा कोणताही चिञपट एकदा बघून संपला असे होत नाही किंबहुना दरवेळी आपण कोणतातरी नविन चिञपट बघत आहोत असे वाटते दरवेळी त्यांचा चिञपटातून निदान मला तरी जीवनविषयक नविन पैलू कळतो मी आतापर्यत किमान ६/७वेळा प्यासा चिञपट बघीतला असेल पण मला तो पुर्ण कळाला असे म्हणने धाडसाचे ठरेल
जरी सत्यजीत ये यांना आँस्करतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असला तरी टाईम्स मँगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वोतक्रुष्ट चिञपटाच्या यादित प्यासा या चिञपटाची निवड केली यातच त्यांचे मोठेपण दिसते गुरुदत्त भारतीय चिञपटातील एक हिरा होते आचार्य अञेंच्या भाषेत बोलायचे झाल्यास गेल्या दहाहजार वर्षात असा अभिनेता दिग्दर्शक निर्माता झाला नाही व पुढील दहा हजार वर्षात होणे नाही तसे या विषयी अजून लिहीता येईल माञ तूर्तास विस्तार भयास्तव थांबतो

टिप्पण्या

Ravindra Shivde म्हणाले…
माझाही आवडता अभिनेता व दिग्दर्शक. गुरुदत्तांचे सर्वच चित्रपट अप्रतिम आहेत.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर ,

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?