मान्सुम का थांबला ?

सध्या आपल्यातील प्रत्येक जन मान्सुमची वाट बघत आहे . हा मान्सुम सध्या अंदमान बेटावर घोघावतो आहे. त्यामुळे सर्वांच्या मानत एकच प्रश्न येत आहे . मान्सुमचे वारे का थांबले त्याची चर्चा करण्यासाठी हा उहापोह
हे समजावून घेण्यासाठी आपणास काही संकल्पना माहिती असणे अत्यावश्यक आहे .
(1)सध्या सूर्य उत्तर गोलार्धात स्थिर असल्याने . पृथ्वीचा उत्तर गोलार्ध जास्त तापतो . तर दक्षीण गोलार्ध कमी तापतो  .
(2)पाणी आणि जमीन यामध्ये पाणी लवकर तापते .जमीन उशिरा तापते.
(3)वारे नेहमीच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात . सबब सध्याचा कालावधीत उत्तर गोलार्धात वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत असतात .

(4)तापलेल्या भागातील हवा वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि तिथे कमी दाबाच्या प्रदेश तयार होण्याची शक्यता असते .
(5) निसर्गाची सदैव सर्वञ सारखा दाब राहील असे वातावरण ठेवण्याची प्रवृती असते त्यामुळे एखाद्या ठिकाणी कमी दाबाचेक्षेञ निर्माण झाल्यास सभोवतिलची जास्त दाबाच्या हवेकडुन संबंधीत पोकळी भरण्याचा प्रयत्न केला जातो . पृथ्वीचा स्वांगभ्रमणामुळे (पृथ्वी स्वत:भोवती पश्चीमेकडून पुर्वेकडे  फिरते त्यास स्वांगभ्रमण म्हणतात ) ते वारे पुर्वेकडून पश्चिमेकडे भिरकावले जातात आणि पश्चीम दिशेकडे  चक्राकार मार्गे  फिरतात त्यामुळे  चक्रीवादळ निर्माण होते  (आता भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा बंगालचा उपसागराच्या पश्चिमेला भारत आहे त्यामुळे तेथील वादळ भारतात येते  माञ अरबी समुद्रातील वाद्ळ  भारतावर फारसा परिणाम करत नाही )
सध्याही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे . अंदमान बेटापासून भारताचा मुख्म भुमीपर्यत असणार्या बंगालचा उपसागरात (तिन बाजूने जमीनीने वेढल्या गेलेल्या समुद्राचा  भागास उपसागर म्हणतात ) कमी दाबाचे क्षेञ निर्माण झालेले आहे . (कारण वाक्य क्रमांक 2 आणि 4नुसार ) परीणामी विषवृतावरुन येणार्या मौसमी वार्यांचा प्रवास अंदमान समुद्रात रोखला गेला आहे
या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ सध्या ईतकंच

आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?