तारीख एक घटना 2


वर्षातील काही तारखा अत्यंत विलक्षण असतात . त्यातलीच एक म्हणजे 11 सप्टेंबर .ही तारीख दोन कारणाने विलक्षण ठरते एक म्हणजे 11सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी केलेले शिकागो येथे केलेले  सुप्रसिध्द भाषण ज्यामुळे वैदीक संस्क्रुतीला एक वेगळी अशी ओळख जगभरात प्राप्त झाली . आणी दुसरी म्हणजे न्यूयॉक येथील वल्ड ट्रेड वरील हल्ला .दोन्ही  घटना युनाटेड स्टेटस आॉफ अमेरीकेतील . दिवस ही सारखाच 11 सप्टेंबर . माञ एका घटनेने जगाला मानवतेचा महान संदेश दिला तर दुसर्या घटनेने कौर्याचा मानवास दु:खी करण्याचा संदेश दिला . कोणता योगायोग म्हणावे यास  सुखद की दुखद . एका घटनेने पाश्चात्य देशांना पौवात्य देशातील ज्ञानचा अनूभव दिला तर दुसर्या घटनेने पौवात्य देशातील कौर्याचा अनुभव दिला . स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांना सुख शांती मिळाली तर  दुसर्या घटनेने दैन दिले तारीख तीच 11 सप्टेंबर फक्त वर्ष बदलले एकाचे 1893 तर दूसर्याचे 2001 एक घटना अमेरीकेचा पुर्व किनार्यावर  (शिकागो ) तर दुसरी पश्चीम किनार्यावर (न्यूयॉक ) एव्हढाच काय तो फरक .पण त्याचे किती वेगवेगळे परीणाम होतात असो स्वामी विवेकानंदांमुळे भारताला एक नवी सकारात्मक  ओळख प्राप्त झाली प्राचीन भारतीय धर्म  जगाला किती प्रमाणात सुखशांती देवू शकतो  आणी दुसर्या घटनेने धर्माच्या नावावर दुसर्याचे जीव कसे घेता येतात ते समजले . या विषयावर खुप काही बोलता येवू शकते माञ समयभयास्तव थांबतो
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Very informative. Knowledgeable information about 11th September.


Madhura Tarted.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?