काळाच्या पुढे बघणारा सिने दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण  भारतीय सिने सृष्टीला पडलेलं एक कोडे .  १० ऑकटोबर२०१८ ला त्यांच्या जाण्याला ५४ वर्ष पूर्ण होतील .  मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने  घेतले जाते यातच त्यांचे  मोठेपण दिसून येते . अत्यंत हळव्या मनाच्या मानवी आयुष्यातील  दुःखांना कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर चित्रित करणारा एक प्रतीभावांत सिने दिग्रदर्शक म्हणजे गुरुदत्त . .
 गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्य म्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांना सहजतेने चित्रित करणे , प्यासा मध्ये मानवी आयुष्यातली नात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवी नाते  कसे  थिटे पडतात  याचे सुंदर चित्रण यातून घडते . कागज के  फूल या चित्रपटातून सिने सृष्टीचे भीषण वास्तव त्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनी आपल्या चित्रपटात अनेक नव्या तंत्राचा वापर सुद्धा केला . त्यांच्या पुण्यतिथी बदल माझ्याकडुउ त्यांना आदरांजली . 
उणेपुरे ३९ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी त्यांनी सिनेसृष्टीत त्यांनी आपले एक स्थान निर्माण केले , जर त्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला नसता तर भारताला ऑस्कर नक्कीच मिळाले असते  यासाठी माझ्या मानत तिळमात्र शंका नाही . मात्र असे  झाले नाही . आपली धर्मपत्नी गीता बाली दत्त आणि त्यांनी  सिने सृष्ट्टीत ब्रेक दिलेल्या तेलगू मुस्लिम असलेल्या वहिदा रेहमान यानाच्या प्रमाचा कात्रीत ते सापडले , ज्यामध्ये त्यांना नैराश्याचा झटका येऊन त्या नैराश्याचा झटक्यातच त्यांनी झोपेच्या गोळ्याचे अतिरिक्त सेवन केले आणि ते झोपी गेले ते कायमचेच
गुरुदत्त यांनी काही फक्त धीरगंभीर चित्रपटांचीच निर्मिती केली असे  नाही . त्यांनी विनोदी  चित्रपट देखील निर्माण केले मिस्टर अँड मिसेस १९५५ हा त्यांनीच तयार केलेला विनोदी चित्रपट .
बंगाली वाटणारे गुरुदत्त हे त्यांचे टोपण नाव त्यांचे खरे नाव वसंत शिवशंकर पदुकोण . मात्र ते त्यांच्या टोपण नावानेच प्रसिद्धीस आले . त्यांचे सुरवातीचे काही आयुष्य कोल्हापुरात गेले . त्यांच्या युष्याचा बराचसा काळ बंगाल मध्ये गेला . बंगाल चा प्रभाव  त्यांच्यावर प्रचंड प्रमाणत पडल्या .  प्यासा  मध्ये हा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो देखील 


  

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Very touching story of Gurudattaji.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?