व्यथा त्यांचा

              आज मी तुमच्याशी या ब्लॉगच्या माध्यमातून संवाद साधत असताना युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशात स्थलांतलाराविषयी मोठे वादळ  उठलय . अमेरिकेने मेक्सिको या देशाच्या मार्फ़त अमेरिकेत येणाऱ्या मध्य अमेरिका खंडातील लोकांविषयी कडक भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारलाय . मेक्सिको देशाबरोबर असणाऱ्या आपल्या सीमेवर मोठे
कुंपण उभारले होते आणि  काल रविवारी मेक्सिको देशाबरोबर असणाऱ्या आपल्या सीमावर्ती प्रदेशात पोलीस तैनात केले होते . आज मेक्सिको देशातच त्यांना येण्यासाठी प्रवेश नाकालाय .सध्या जगभरात निर्वासितांचा मोठा प्रश्न आहे
         दोन वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिकी खंडातील  देशातून येणाऱ्या स्थलांतरित लोकांचा मोठा प्रश्न गाजला होता . किंबहुना या स्थलांतरितांचा समूहातील एका छोट्या मुलाचा किनाऱ्यावर आलेला मृतदेह त्या वर्षीचा सर्वाधिक  चर्चिला गेलेला विषय होता . भारताच्या शेजारील देश असणाऱ्या बांगलादेश आणि म्यानमार यांच्यात वादाचा विषय असणाऱ्या रोहिंग्यांचा विषय सुद्धा या
स्थलांतरांचाच विषय आहे . भारतासह या दोन्ही देशातील सरकारने त्यांना प्रवेश नाकारलंय

             कोणताही निर्वासित मूळ देशातील स्थिती जगण्यास अवघड झाल्यावरच देश सोडण्याचा विचार करतो त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायलाच हवा . त्या लोकांमुळे त्यांना आश्रय देणाऱ्या देशावर काहीस ताण  पडत असला तरी त्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करायला हवा.  युनाटेड नेशन वर सर्व  गोष्टी करेल यावर विसंबून राहता नव्हे .

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
It's very true. And it is a serious topic of International level.
I am totally agree with you about the topic.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?