मुंढे पर्वचा अस्त

             ज्याचे कुणाशीच पटत नाही , अश्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातच दोष असतो . या अर्थाचे एक दासबोधात वचन आहे. हे सांगायचे कारण की नुकतेच माजी झालेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे . यांची झालेली बदली .
               आपल्या भारतात लोकशाहीचे ४ स्तंभ आहेत . श्री तुकाराम मुंढे ज्या यंत्रणेचे भाग आहेत ती प्रशासन व्यवस्था ,त्यातीलच एक . मात्र त्यांचे त्यांनी जिथे इथे कार्य केले  त्या प्रत्येक  स्थानिक लोकप्रतिनिधींसी  व्यवस्थेशी त्यांचे खटके उडाले . जे माझ्या मते सर्वथा अयोग्य आहे. एका ठिकाणचे लोकप्रतिनिधी सडके असू शकतात . मात्र सर्वच लोकप्रतिनिधी चुकीचे हे सर्वथा ना पटणारेच आहे. भारताच्या ४ लोकशाही स्तभांपॆकी एका स्तंभाच्या हा पूर्णपणे अपमान ठरतो .
                    भलेही तुकाराम मुंढे चांगले करण्यासाठी धडपड असतील मात्र कोणतेही कार्य करण्याची एक प्रक्रिया असते . जी नाशिक महानगरपालिकेत पाळली गेली नाही  द्योतक आहे असे मला वाटते . एका अधिकाऱ्याने केलेली आत्महत्या असो की  एक अधिकाऱ्याचे पलायन असो ही  सर्व याचेच आहे . त्यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते असे मला वाटते . जर त्यांनी एककल्ली कारभार न करता कर्मचाऱ्यांचा अडचणी समजून घेऊन कार्य केले असते त्यांनी खरोखरच नंदनवन  फुलवले असते . असो 
                        या बाबत मला मला महाभारतातील एका गोष्टीची आठवण होते महाभारतातील युद्धामध्ये दोणाचार्यांचा मुलाला  बाण लागून तो जखमी होतो हे ऐकून दोणाचार्य  सैरभैर होतात खरंच आपल्या मुलाला बाण लागला की अश्वत्थामा अर्थात अर्थात हत्तीला बाण  लागला आहे . . याची खातरजमा करण्यासाठी ते कायम सत्यवचनी असणाऱ्या युधिष्टराकडे येतात . युधिष्टिर म्हणतो अश्वत्थाम्याला  बाण   लागला  हे खरे आहे मात्र तो अश्वत्थामा कोणता हे मला माहिती नाही . आपल्या मुलांना बाण लागला  असे समजून दोणाचार्य चटकन खाली बसतात . 
सांगायचं मुद्दा अशा कि नियम सार्वत्रिक असले तरी सार्वकालिक नसतात . परिस्थिती बघून ते वापरायचे असतात . 
   लोकप्रतिनिधी या बाबत धुतल्या तांदळासारखे  आहेत असे मात्र कोणी  समजू नये , आपली निवडणूक व्यवस्था अर्थकेंदीत झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत खर्च झालेला पॆसा वसूल करण्यासाठी ते प्रयत्न करणारच हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. तरीही त्या लोकप्रतिनिधींकडून समाज उपयोगी कामे करून घेणे आवश्यक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?