त्या दहा वर्षातील गुरुदत्त

गेल्या काही दिवसांपासून मी हिंदीतील एक असामन्य निर्माते दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांचा जीवनावर आधारीत मुळचे इंग्रजी भाषेतील ाञ मराठीत अनुवाद झालेले "त्या दहा वर्षातील गुरुदत्त " हे पुस्तक वाचत होतो. आताच ते वाचून संपले . मुळचे इंग्रजी पुस्तक सत्या सरन यांनी लिहलेले आहे . तर मिलींद चंपानेरकर यांनी त्याचा अनुवाद केला आहे . पुस्तकात गुरुदत्त याच्या बरोबर काम केलेल्या अबरार अल्वी त्यांचा आठवणी लेखीकेबरोबर शेअर (सामाईक ) केल्या आहेत . अर्थात हे पुस्तक एकाने सांगीतले दुसर्याने लिहून घेतले अश्या प्रकारचे नाही . अबरार अल्वी यांनी सांगितलेल्या कथनावर लेखिकेने (अनुवादक जरी पुरुष असला तरी मुळ लिखाण करणारी स्ञी आहे त्यामुळे लेखीका ) भाष्य केले आहे. आणी कथन आणी भाष्य हे लिखाण वेगवेगळ्या फॉन्ट (टंक) मध्ये केल्याने (निदान अनुवादित पुस्तकात तरी मुळ पुस्तकाबाबत माहीती नाही ) सहज समजते , भाष्य कोणते अणी कथन कोणते ते . पुस्तक प्रकरणांंमध्ये विभागले आहे . प्रत्येक प्रकरणाला गुरुदत्त यांचा चिञपटातील गाण्याचे बोल वापरले आहेत . (त्यामुळे मला पण अरे हे प्रसिध्द गाणे गुरुदत्तांचा चिञपटातील आहे असे आश्चर्याचे धक्के पण बसले असो.)गुरूदत्त यांचा आयुष्यातील सर्वाधीक रहस्यमय भाग म्हणजे गीता दत्त गुरु दत्त आणी वहीदा रेहमान यांचे परस्परामध्ये असणारे भावविश्व याला माझा मते पुस्तकात अजून जागा द्यायला पाहीजे होती ,जी देण्यात आलेली नाही . पहीले प्रकरण आणी शेवटुन दुसरे प्रकरण किंवा पानाचा भाषेत बोलायचे झाल्यास एकुण 250 पानांपैकी फक्त 20 पाने या संदर्भात आहेत , जी कमी आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे . तुमचे मत या पेक्षा भिन्न असू शकते ,आणी मला तुमच्या मताचा पुर्ण आदर आहे . त्या घटनेमुळेच एका अत्यंत मनश्वी प्रतीभावंत कोमल हद्य्री चिञपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता आपल्यातून निघून गेला असल्याने यावर अधीक प्रकाश टाकणे गरजेचे होते . बाकी पुस्तक उत्तमच आहे . एखादा चिञपट तयार करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो , एखादा चिञपट तयार करण्यासाठी पडद्यामागे किती व्यक्ती खपत असतात याची सूध्दा माहिती हे पुस्तक वाचताना समजते मागे एकदा NDTV वर सुध्दा वहिदा रेहमान यांची मुलाखत बघताना या विषयाला बगल दिली होती असो . राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी असणारा आनंद या चिञपटातील वाक्य आहे .आनंद मररा नही आनद मरते नही ते वाक्य मला गुयरुदत्त यांचा बाबतीत अत्यंत चपखल बसते असे वाटते ते म्हणजे गुरुदत्त जैसै दिग्दर्शक मरते नही! गुरुदत्त मरे नही ! ते आजही आपल्यात आहेत त्यांचा चिञपटाचा रुपाने त्याचा दुर्दैवी निधनानंतरही इतक्या वर्षांनी ते परत चर्चेत आहेत यातच त्यांचे मोठेपण दिसुन येते . त्यांचा विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पून्हा भेटण्यासाठी तो पर्यत आपण म्हणूया जाने वो कैसै लोग थे जिन्होने इतने अच्छे चिञपट बनाये , हमने चाहा बनाने को चिञपट तो सिर्फ पैसांकी बरबादी हूवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?