महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्यातील एसटी एक तुलना
मी नुकताच पुणे नाशिक कर्नाटक परीवहन महामंडळाच्या व्होल्वो गाडीने तर नाशिक पुणे गुजरात परीवहन महामंडळाच्या साध्या बसने प्रवास केला. त्यासाठी मला अनुक्रमे 460 आणि 260 रुपये लागले . त्यावेळी आलेल्या अनुभवाचे हे कथन
महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या शिवशाही या बसचे नाशिक पुणे भाडे 410 रुपये आहे. याउलट अत्यंत कमी कर असल्याने कर्नाटकच्या व्होल्वाबस चे भाडे 460 रुपये आहेत. आता नाशिक पुणे शिवनेरी बंद आहेत. मात्र त्या जेव्हा चालू होत्या तेव्हा त्यांचे भाडे 600 रुपये होते. मागे एकदा मी तेलंगणा परिवहन महामंडळाच्या बस मधून पुणे - सोलापूर मधून प्रवास केला .त्यावेळी मला महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस पेक्षा तब्बल ४० रुपये कमी लागले . त्यानंतर गोवा परिवहन महामंडळाच्या (कदंब ट्रान्सपोर्ट ) बसने पुणे कोल्हापूर
प्रवास केला . त्यावेळेस देखील तब्बल ४० रुपये कमी लागले .
त्यानंतर मी TSRTC आणि GSRTC च्या संकेतस्थळावर चौकशी केली असता मला समजले की फक्त MSRTCच सवलती देते असे नव्हे तर अन्य SRTC सुध्द्दा सवलती देतात . मात्र त्या SRTC MSRTC च्या तुलनेत अधिक चांगल्या सेवा देऊ शकतात याचे कारण म्हणजे त्या सरकारला देत असणारे करांचे अत्यल्प प्रमाण . माझ्यामते हे कर कमी करणे काळाची गरज आहे तुम्हाला काय वाटते

टिप्पण्या