ख्रिस्तीबहुल राज्यातील हिंदुत्व


             ११ डिसेंबर २०१८ रोजी भारतातील राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले . आणि समस्त वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत काँग्रेसची घोडदौड आणि भारतीय जनता पार्टी ची पीछेहाट यावर चर्चा सुरु झाल्या . मात्र या मध्ये किमान मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सुटलेला मुद्द्यावर वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच 
                या निवडणुकीत जवळपास १०० % लोकसंख्या  ख्रिस्ती धर्माच्या असलेल्या मिझोराम मध्ये भारतीय जनता  पार्टी या हिंदुत्व या विचारसरणीवर असलेल्या पक्षाचा झालेला प्रवेश . काही जण म्हणतील मिझोराम मध्ये किती खासदार आहेत त्या राज्यातील घडामोडींचा देशाच्या राजकारणावर कितीसा तो परिणाम होणार
    त्यांना मी सांगू  इच्छितो की , भलेही मिझोरामची राजकीय ताकद अत्यल्प असली तरी, त्यातील समाजजीवनातील हिंदूंचे असणारे नगण्य प्रमाण , तेथील फुटीरतावादी संघटनांचे असणारे प्राबल्य , त्याला मिळणार देशविघातक संघटनांची मदत, याचा  विचार करता हा प्रवेश चंचूप्रवेश  असला तरी अत्यंत महत्तवाचा आहे . यासाठी हिंदुत्वासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनांना श्रेय द्यावेच लागेल . त्यांनी त्याभुभागाला भारताच्या मुख्य भूभागासाठी जोडण्याचा प्रयत्नाचा नावाखाली केलेले प्रयत्न याला आलेले फळ म्हणजे भाजपाच्या झालेला प्रवेश . कोणतीही सुरवात छोटीशीच असते त्या अनुषंगानेच याकडे बघायला हवे . ईशान्य भारताचा विचार करता आसाम वगळता भाजपाचा फारसा जनाधार नाही . त्यामुळे याचा विचार काणे अत्यावश्यकच आहे . 
या आधी झालेल्या २०१३ च्या निवडणुकीत मिझोराम मध्ये भाजपाला एकही सीट मिळाली नव्हती . हे विशेष . 
भाजपाच्या अन्य राज्य उडालेल्या धुव्याच्या  पाश्वभूमीवर या कडे बघणे आवश्यक आहे . सर्वधर्मसमभाव जपणारी काँग्रेस ची मते मिझोराम मध्ये प्रचंड प्रमाणात कमी झालीये . राहुल गांधींनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे .    

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Yes. Very true.
BJP has entered in Mizoram.
It is good for Bjp lover's, but tension for congress.


Madhura Tarte .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?