संसद हल्याच्या निमित्याने

आज १३ डिसेंबर २०१८ . आजच्याच  दिवशी १७ वर्षांपूर्वी  म्हणजे १३ डिसेंबर २००१ ला पाक पुरस्कृत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर भ्याड हल्ला केला .  खासदारांच्या गाडीवर असणारे स्टिकर आपल्या गाडीवर लावून आलेल्या अतिरेक्यांनी संसंसदेवर हल्ला केला ज्यात एका पत्रकार २ संसदेच्या कर्मचाऱ्यांसह ७ जवान शहिद झाले. तर १८ जण जखमी झाले . यावेळी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या सुरक्षा रक्षकांना यश मिळाले .तर एका अतिरेक्याने आत्मघातकी स्फोट करून स्वतःला उडवून दिले .  देशाच्या सर्वोच्च ठिकाणी करण्यात आलेल्या या हल्याने त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता कालांतराने या कटाची पाळेमुळे खणून काढत या काटातील सुत्रधार मूळचा काश्मिरी  आणि दिल्ली येथील विद्यापीठातील प्राध्यापक अफजल गुरु .याला पकडून नंतर फाशी देण्यात आले .                                                                 
        संसंदेवर हल्ला करून अतिरेक्यांनी भारताच्या सार्वभौमात्मवरच हल्ला केला होता. ज्याला आपल्या सुरक्षा यंत्रणांनी खोख उत्तर दिले .  त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू होते त्यामुळे देशातील सर्वच खासदार त्यासवेळी संसदेत हजार होते . तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी , विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी , लालकृष्ण अडवाणी  यांच्यासह  महत्वाचे नेते त्यावेकी संसदेत हजर होते . सुदैवाने आपले सर्व नेते त्यात सुरक्षित राहिले . सुमारे पाऊण तास ही  धुमश्चक्रि चालू होती . . आणि त्यात आपल्या  सुरक्षा रक्षकांना  यश  मिळाले. मात्र  या हल्ल्याच्या खुणा आजही संसद प्रांगणात दिसतात . त्यावेळी मारण्यात आलेल्या गोळ्याचे निशाण आजही भिंतीवर  कायम आहेत . 
संसदेमधीय VVIP  संस्कृतीच्यामुळे  खासदारांची गाडी न तपासताच तशीच पुढे नेण्याची  प्रथा त्यावेळी सुरु होती , त्याचाच फायदा घेत हा हल्ला करण्यात आला . त्यानंतर मात्र संसदेची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली 
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढारकातून सुधारत असलेल्या भारत पाक संबंधाना त्यामुळे पुन्हा एकदा खीळ बसली . 
 या हल्ल्यात हौतात्म आलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?