कांदयाने आणले डोळ्यात पाणी


      भारतातील प्रमुख कांदा उत्पादक  क्षेत्र असलेला नाशिक जिल्हा सध्या चर्चेत आहे तो कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे . अवघा १०० रुपये भाव दर क्विंटल मागे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये . परिणामी अत्यंत मातीमोल भावाने कांदा  विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याकडे शेतकऱयांचा कल  आहे. या मागच्या कारंणाची  मीमांसा केली असता आपणास लक्षात येते की या मागची सर्व करणे मुख्यतः सुलतानी आहेत . गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांन भरभरून कांद्याचे उपादान घेतले . मात्र सुलतानी संकटामुळे त्या कांद्याला बाजारपेठांचा उपलब्ध नाहीये परिणामी मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे.त्यामुळे भाववाढी मुळे शिला दीक्षित अश्या सारखा राजकरण्याना रडवणारा कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे 
   
                       नाशिकच्या कांद्याला बाजारपेठ म्हणून भारताखेरीज  पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आदी देशात बाजापेठ मिळते . यावेळी बांगलादेश आणि श्रीलंका आदी देशातून मागणी आली नाही परिणामी निर्यातीला कमी वाव मिळाला . पाकिस्तानच्या राजकीय  कारणामुळे तेथील निर्यात बंद आहेत . त्यामुळे  परदेशी निर्यातीला पूर्णपणे खीळ बसली . त्यात पूर्वी चाळीत साठवलेला कांदा  साठून खराब होत असल्याने तो व्यापारानि बाजारात आणला परिणामी बाजारात कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात कोसळले
यावर उपाय योजना करायची झाल्यास स्वामिनाथन आयोगाची तात्काळ विनाविलंब कोणतीही राजकीय सोया गरसोय बघता अंमलबजावणी करणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे कांद्यावर साठवणुकीसाठी प्रक्रिया जसे निर्जलीकरण आदी प्रक्रिया उदयॊग मोठ्या प्रमाणात उभारणे . कांद्याचे भाव वाढल्यावर ज्या प्रमाणे सरकार निर्यात बंदी सारखे उपाय योजून कांद्याचे भाव नियंत्रित करते त्याच धर्तीवर कांद्याचे भाव पडत असताना कार्यवाही करणे आदी उपाय योजावे लागतील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?