राष्ट्रीय भूगोल दिनाच्या निमित्याने

भूगोल , शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय , मात्र तेव्हढाच उत्साहवर्धक विषय. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी , त्याचे महत्व लोकांना समजावे , या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिन . १४ जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो .                त्यानिमित्याने समस्त भूगोल प्रेमींना खूप खूप शुभेच्छा .
भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत मत्त्वाचा विषय आहे . रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित आहेत . मकर संक्रांत हा सण तर त्याचेच एक प्रातिनिधिक स्वरूप . 
                      भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .                          छ्त्रपती शिवाजी महाराज यांची युद्धदनीती हि लष्करी भूगोलावर आधारित होती . आपले राजस्थानी आणि गुजराती बांधव पिढीजात व्यवसाय करू शकतात . याची करणे तेथील भौगोलिक परिस्थीशीं परिणाम साधणारी आहेत . आपल्याकडे हिवाळ्यात पक्षी येतात . याचे कारण  सुध्द्दा भूगोलाशी संबंधित आहे . सध्या  आपण अत्यंत विषम अनुभवतो आहोत याचा सुध्द्दा अभ्यास भूगोलात करण्यात येतो कोकणातील घरे उतरत्या छपराची असतात यामागे सुध्द्दा भूगोलाच कारणीभूत असतो . सध्या रस्त्याने जाताना आपणास ठीक ठिकाणी रस्त्याची मोजणी करताना दिसतात . तो सुद्धा भूगोलाचा विद्यार्थी असतो 
              केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC ) कडून नागरी सेवेशिवाय (CIVIL SERVICE EXAM ) ज्या परीक्षा घेतल्या जातात .  त्यामध्ये भूगोल विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाते . 
                 भूगोल विषय ना आवडता होण्यासाठी  एक घटक म्हणजे त्याची परिभाषा आपण सर्वसामान्य भाषेत ज्याला पाऊस म्हणतो त्यास भूगोलाच्या तांत्रिक भाषेत पर्जन्य म्हणतात . या परिभाषिक शब्दांमुळे  विषय क्लिष्ट होतो . नावड निर्माण होण्यामागचे  हे एक महत्त्वाचे कारण आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?