चित्रपटांचा नवीन ट्रेंड

सध्या भाई व्यक्ती की वल्ली  अर्थात पु ल देशपांडे यांच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्या पाश्र्वभूमीवर चित्रपट निर्मितीचा नवीन ट्रेंड विषयीचे माझे आकलन समर्थ रामदास स्वामी यांच्या 'जे जे आपणासी ठाव !ते ते  सकळांसी मांडावे !! शहाने करून सोडावे सकल जना !!!'  या उक्तीला जागत खास तुमच्यासाठी . हे लेखन परिपूर्ण नाही याची जाणीव ठेवून केलेला हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच  आवडेल अशी आशा आहे
     शेवटाकडून विचार करायचा झाल्यास सध्या ज्याला इंग्रजीत बायोपिक म्हणतात त्या प्रकाराच्या चित्रपटांचे प्रमाण वाढलेले दिसते . या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेला भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट असो अथवा  मेरी कॉम यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा भाग मिल्खा भाग असो अथवा सध्या चर्चेत  असणारा ऍक्सिडेंटल  प्राय मिनिस्टर  हा चित्रपट असो अथवा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा बाजीराव मस्तानी यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो ही यादी अजून पुढे वाढवता येऊ शकते .
त्याच्या आधी चित्रपटांवर प्रेमावर आधारित चित्रपटांचा प्रभाव होता . १९८० च्या काळाचा विचार करता तेथील अशांत  राजकीय परिस्थितीच्या चित्रपटाच्या विषयावर परिणाम झालेला दिसतो .  अमिताभ बच्चन यांचे जुन्या चित्रपटातील संवाद याचीच ससाक्ष देतात . जसे,  "कलसे और एक कुल्ली लगान  नही देगा" किंवा "ये पुलिस स्टेशन है तुम्हारा बाप का घर नही जबतक  बैठने को नही कहा जाता खडे ही राहो",  वगैरे .
ह्या चित्रपटांची सुरवात  पौराणिक चित्रपटांपासून झालेली दिसते . अयोध्याचा राजा , राजा हरिशचद्र  ही  त्याचीच उदाहरणे म्हणता येईल . मधल्या काळात गुरुदत्त यांनी वास्तव मांडणारे काही चित्रपट मांडले जसे चित्रपट  सृष्टीचे ष्टीचे वास्तव मांडणारा कागज के फूल असो अथवा रक्ताच्या नात्यातील  फोलपणा मांडणारा प्यासा असो , त्यानंतर मधुर भांडारकर सत्यजित रे यांच्या सारख्याच अपवाद वगळता या माध्यमांनी आभासी चित्रच पुढे आणले . अत्यंत प्रभावी असणारे हे माध्यम निखळ करमणुकीसाठीच वापरले गेले त्यामध्ये अमीर खान यांनी तारे जामीन पर , थ्री इडियट्स , पिपली लाईव्ह सारखे सामाजिक विषय काही प्रमाणात हाताळले हाचा काय तो अंधारात मिणमिणता दिवा .

टिप्पण्या

mindmaster म्हणाले…
सुंदर व अभ्यासपूर्ण लिखाण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?