बदलते जग आणि मी

 
                                 सध्या आपण सर्वच प्रचंड मोठ्या स्थितांतरांतून जात आहेत . ज्यामध्ये माणूस एकीकडी समाजकेंद्रीत सोडून व्यक्तिकेंद्रित होता चालला आहे . मग आपल्याकडे होणारी भूमिपुत्रांची होणारी  अथवा अमेरिकेतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची  भूमिका तसेच वाढत्या आत्महत्या ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत . सध्या पारंपरिक प्रकारचा रोजगाराच्या संधी कमी होता असताना पूर्वी विचार ही  केलेली क्षेत्रे रोजगारासाठी उपलबद्ध होत आहेत जसे उबेर इट झोम्याटयो , स्वीगी सारख्या सेवा क्षेत्रातील रोजगार उपलब्ध होत असताना टेलिकॉम क्षेत्राला आलेली मरगळ,  विविध ऑनलाईन रिचार्ज सुविधांमुळे मोबाईल  मरगळ . एन डी टी व्ही सारख्या वाहिन्या

कॅमेरामन संस्कृतीला ब्रेक देत रिपोर्टर कडूनच स्लेफी च्या माध्यमातून करत असणाऱ्या रिपोर्टींग किंवा सध्या नव्याने उदयास  सिटीझन जर्नालिस्ट या प्रकारामुळे वर्तमानपत्रात असणाऱ्या पत्रकारांच्या कमी होणाऱ्या संधी किंवा ईमेलच्या सुविधेमुळे बीएसएनएल सारखया कंपन्याने कागदी बिलाला दिलेली सोडचिठी आणि त्यामुळे कुरियर सेवेवर झालेला परिणाम असतानांच ब्लॉग किंवा युट्युबवर जाहिराती देऊन त्यातून अर्थप्राप्ती करण्याची संधी निर्माण झाली आहे
              सध्या महाराष्ट्रात पडलेली थंडी असो , किंवा ऑस्टोलियात जाणवणारा असह्य असा उकाडा असो , मराठवाड्यात पडलेला दुष्काळ असो किंवा दक्षिण अमेरिकेतील मुसळधार पाऊस असो , अथवा दिवसोंदिवस उग्र होत  चक्रीवादळे सर्वच त्याचीच  देत आहेत .

असे असताना आपल्या साताधिकाऱ्यांकडून अस्मितांचे राजकारण खेळले जात आहे . ज्यामुळे सर्वसामान्यांच्या सध्याच्या किंवा भविष्यात  भेदवसणाऱ्या संकंटांना मात्र बगल देण्यात येत आहे . याठिकाणी मराठीतील ऋषितुल्य कवी असणाऱ्या कवी केशवसुत यांच्या   तुतारी कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही . त्यात सांगितल्या प्रमाणे "जुने लागुड्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका "याची नितांत गरज आहे . नाहीतर सध्याच्या विज्ञानाला ज्ञात असणाऱ्या एकमेव मानव सृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाची मानव वस्ती असणाऱ्या भारताच्या युवा पिढीला भविष्यात प्रचंड त्रास झाल्यावाचून राहणार नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?