एका भिंतीचे महाभारत


     
संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवण्यांची वदंता आपल्याकडे सांगितली जाते  याच्या सत्य्असत्येबाबत वाद निर्माण होउ शकतात. मात्र अश्याच एका भिंतीने सध्या यूनाटेड स्टेटसमध्ये भल्याभल्याना घाम फोडलाय. राष्ट्रीय आणिबाणी जाहीर करण्यापर्यत तेथील परीस्थिती बिघडलीये .आणि याला कारणीभुत ठरली आहे प्रेसिडन्ट  
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरीकेच्या दक्षिण सीमेवर सीमाभिंत उभारण्याचा बांधलेला चंग .आपले निवडणूकीत दिलेले आश्वासन खरे करण्यासाठी प्रेसिडन्ट डोनाल्ड ट्रम्प  यांना तेथील संसदेने ज्याला कॉग्रेस असे संबोधले जाते त्यातील एका पक्षाने  खर्चाला विरोध केल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग म्हणजे हा भिंतीचा वाद 



            प्रेसिडन्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भिंत उभारण्यासाठी जी कारणे दिलीये ते बघीतले तर कोणालाही त्याचा अभिमान वाटेल त्यांनी  दक्षिण सिमेवरून होणारी अमंली पदार्थाची विक्री मेक्सीको या देशामधून होणारी घूसखोरी ज्यामूळे स्टेटस मध्ये वाढणारी गून्हेगारी आदी कारणे पुढे केली आहेत .जी कोणालीही पटण्यासारखी आहेत   


               येथे एक मूददा विचारात घेयला हवा तो म्हणजे अमेरीकन विधीमंडळाची रचना आपल्यासारखीच आहे आपल्याकडे ज्याला राज्यसभा म्हणतात त्याला तिथे house of representative म्हणतात तर आपल्याकडे ज्याला लोकसभा म्हणतात त्याला तिथे  .senate म्हणतात . तिथे मुख्य दोन पक्ष आहेत democratic आणि republic.तसे green party , tea party अशे फुटकळ पक्ष पण आहेत . पण ते खरोखरच फुटकळ आहेत ज्यांचा सहभाग 4 ते 5 % टक्यांपेक्षा अधिक नाही . त्यामुळे त्यांना वगळून टाकूया . सघ्या तिथे रिपब्लीक पक्षाचे सिनेटमध्ये बहूमत आहे. तर हाउस ऑफ रिपंझीटेव्हीमध्ये डेमॉक्राक्टीक पक्षाचे बहूमत आहे. सध्याचे राष्टाघ्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  republic पक्षाचे आहेत .  आणि प्रश्नाची सूरवात होते ती इथेच . अमेरीकन राष्टाध्यांक्षांना अमर्याद अधिकार असले तरी कॉग्रसच्या मंजूरीशिवाय त्यांना खर्च करता येत नाही जर अकस्मात खर्च केला तरी कालांतराने त्यांची मंजूरी घ्यावीच लागते . आणि येथूनच नाटयाला सुरवात होते .

     
    राष्टाध्यक्ष 
डोनाल्ड ट्रम्प  यांना दक्षिण सीमेवर
भिंत उभारण्यास डेमॉक्राक्टीक पक्षाने विरोध केलाय त्यांचा मते डोनाल्ड ट्रम्प काल्पनिक भिती निर्माण केली आहे . मेक्सीको देशाकडून अमेरीकेला म्हणता आहेत तशा धोका नाहीये . डोनाल्ड ट्रम्प  म्हणत आहेत तो धोका टाळण्यासाठी अन्य उपाय योजले पाहिजेत . त्यावर भिंत हा उपाय होउच शकत नाहीये. त्यामूळे त्यापक्षाने भिंत उभारण्यासाठी ट्रम्प यांना पैसा देण्यास नकार दिलाय. या नकारामूळे अमेरीकेतील राजकारण चागलच ढवळून निघालय या प्रश्नामूळे तेथील सरकारचे दैनंदिन खर्चावर बंधन आले होते.तेथिल केंद्र सरकरच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 35 दिवस पगाराशिवाय काम केले . अमेरीकेत अश्या काळास शटडाउन म्हणतात. आतापर्यत अमेरीकेत आलेल्या शटडाउन पैकी आताचे शअडाउन सर्वात माठे शटडाउन  होते . मात्र त्यातही कोडी न फुटल्याने अखेरचे ब्रम्हास्त्र म्हणून डोनाल्ड ट्रम्प्‍ यांनी त्यांना असलेल्या पॉवरच्या वापर करत राष्ट्रीय आणिबाणी जाहिर केलीये .

                       आता याचा जगावर आणि भारतावरील परीणामांचा विचार करूया
सध्या भारताच्या प्रमूख प्रतिस्पर्धी चिनचा अर्थव्यवस्थेचा दर गैल्या काही वर्षातील निच्चांकी पातळीवर आहे . काही दिवसापुर्वी चीन आणि अमेरीकेतील व्यापरायुध्द शिगेला पाहोचले होते. त्या पाश्वभुमीवर याकउे बघीतल्यास भारताच्या बाबतीत समाधानकारक स्थिती निर्माण होउ शकत नाही .या युध्दाचा प्रेसिाडन्ट ट्रम्प यांनी त्याचा आणिबाणी जाहिर करण्याचा पत्रकार परीषदेत उल्लेख केला  होताच  त्याच प्रमाणे  डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिर केल्याप्रमाने जगातील विविध देशातील सध्या तैनात असलेल्या अमेरीकन सैन्यात कपात होउ शकते, ज्यात अफगाणिस्तनमधील सैन्याचा देखील समावेश होतो . भारत सघ्या अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकारची विकासकामे करत आहे. अमेरीकन सैन्य  तेथून बाहेर पडल्यास तेथील धर्मांतेला पुन्हा एकदा खतपाणी मिळून या विकासकामांना खिळ बसू शकते. आपल्या द्रूष्ट्रीने आनंदाची  बाब म्हणजे अमेरीकेची पाकिस्तानविषयक आस्था कमी होउ शकते. अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत . भविष्याच्या पेटाऱ्यात काय वाढून ठेवलंय हे येणारा काळच ठरवेल यात शंकाच नाही. जाता जाता ज्या पत्रकारपरीषदेत 4 मिनीटात अमेरीकन प्रेसीडन्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणिबाणिची धोष्ण केली त्याची यूटयूवरील लिंक बघूया

                                         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?