गुरुदत्त वहीदा रेहमान अणि गीता दत्त

                   आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा आहे एका अत्यंत हून्नहरी सिने अभिनेत्याची ज्यांनी आपल्या 20 वर्षच्या सिने कारकर्दीत भल्याभल्यांना आपल्या प्रतिभेने भूरळ धातली . त्यांचे निधन झाल्यावर पन्नास वर्षे झाली तरी ही मोहीनी अद्याप कायम आहे  कोणतीही पारीवारीक पाश्वभूमी नसताना सर्वसामान्य  कोरोग्राफर ते सिनेनिर्माता दिग्दर्शक अशा त्याचा प्रवास थक्क्‍ करून सोडणारा आहे मी बोलणार आहे वसंतकुमार शिवशंकर पडूकोन अर्थात गूरूदत्त्‍ यांच्याविषयी मानवी आयूष्यातील दु:खे समस्या अडचणी सहजतेने रुपेरी पडद्यावर साकारणे आणि  त्यातून मनोरंजन करणे हा त्यांचा चित्रपटाचा मुख्या विषय होता .प्यासातून मानवी आयुष्यातील रक्तच्या नात्याती निरर्थकता गुरूदत्त्‍ यांनी प्रभावीपणे मांडलीये . भारतीय सिने सृष्टीला पडलेलं एक कोडे .असेच त्यांचाबददल म्हणावे लागेल.   १० ऑकटोबर२०१८ ला त्यांच्या जाण्याला ५४ वर्ष पुर्ण झाली .मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने  घेतले जाते यातच त्यांचे  मोठेपण दिसून येते . अत्यंत हळव्या मनाच्या मानवी आयुष्यातील  दुःखांना कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर चित्रित करणारा एक प्रतीभावांत सिने दिग्रदर्शक म्हणजे गुरुदत्त . .
                                  गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्य म्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांना सहजतेने चित्रित करणे , प्यासा मध्ये मानवी आयुष्यातली नात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवी नाते  कसे  थिटे पडतात  याचे सुंदर चित्रण यातून घडते . कागज के  फूल या चित्रपटातून सिने सृष्टीचे भीषण वास्तव त्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनी आपल्या चित्रपटात अनेक नव्या तंत्राचा वापर सुद्धा केला
                             उणेपुरे ३९ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी सिनेसृष्टीत त्यांनी आपले एक स्थान निर्माण केले , जर त्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला नसता तर भारताला ऑस्कर नक्कीच मिळाले असते  यासाठी माझ्या मानत तिळमात्र शंका नाही . मात्र असे  झाले नाही . आपली धर्मपत्नी गीता बाली दत्त आणि त्यांनी  सिने सृष्ट्टीत ब्रेक दिलेल्या तेलगू मुस्लिम असलेल्या वहिदा रेहमान यानाच्या प्रमाचा कात्रीत ते सापडले , ज्यामध्ये त्यांना नैराश्याचा झटका येऊन त्या नैराश्याचा झटक्यातच त्यांनी झोपेच्या गोळ्याचे अतिरिक्त सेवन केले आणि ते झोपी गेले ते कायमचेच
                   गुरुदत्त यांनी काही फक्त धीरगंभीर चित्रपटांचीच निर्मिती केली असे  नाही . त्यांनी विनोदी  चित्रपट देखील निर्माण केले मिस्टर अँड मिसेस १९५५ हा त्यांनीच तयार केलेला विनोदी चित्रपट .एका श्रीमंत मात्र मूर्ख मूलीमूळे घडणाऱ्या करामती यात सांगीतल्या आहेतण्‍  बंगाली वाटणारे गुरुदत्त हे त्यांचे टोपण नाव त्यांचे खरे नाव वसंत शिवशंकर पदुकोण . मात्र ते त्यांच्या टोपण नावानेच प्रसिद्धीस आले . त्यांचे सुरवातीचे काही आयुष्य कोल्हापुरात गेले . त्यांच्या युष्याचा बराचसा काळ बंगाल मध्ये गेला . बंगाल चा प्रभाव  त्यांच्यावर प्रचंड प्रमाणत पडल्याप्यासा  मध्ये हा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो देखील. माझ्या मित्रांमघ्ये सातत्याने हे बोलले जाते की आयुष्य म्हणजे काय हे समजायचे असेल तर गुरुदत्तचे चिञपट बघितले पाहिजे आणी ते खरही आहेच ना ? प्यासा मधील कवी विजय असो ज्याला त्याचा स्ट्रगलच्या कालावधीत प्रचंड हालअपेष्टा अपमान सहन करावा लागतो माञ तेच जग त्याला प्रसिध्दी मिळाल्यावर कशे बदलते त्याला आम्ही मदत कशी केली हे त्याचे भाऊ कशे सांगतात जे तद्दन खोटे असते किंवा फिल्मी दुनियाची भीषणता सांगणारी कागज के फूल हा चिञपट असो त्यांचे सर्वच चिञपट एकाहून एक जीव ओवाळून टाकणारे होते . मला तर असे वाटते की गुरुदत्तांचे झोपेच्या गोळ्या दारु यांच्या एकञित सेवनाने निधन झाले नसते तर भारताने आतापर्यत / आँस्कर नक्कीच प्राप्त केले असते अत्यत हळव्या मनाचा स्रूजनशील निर्माता दिग्दर्शक अभिनेता आपण गमवला तो अत्यंत तरुण पणी म्हणजे जेमतेम 39 वर्षाचा असताना गेला त्यांचा एका सहकार्याने 10 years with Gurudatt नावाचे त्यांचा आठवणीचे पुस्तक लिहले आहे त्याचा त्या 10वर्षातील गुरुदत्त या नावाने अनुवाद झाला आहे.  त्यामघ्ये त्यांचे भावविश्व अत्यंत सहजतेने मांडलेले आहे. साहब बाबी और गुलाम हाही त्यांचा एक उत्तम चित्रपट.   या चिञपटाची कथा त्यांचा वैयक्तिक आयुष्यावर बेतलेली होती असे म्हणतात सर जो तेरा चकराये--- तेल मालीश किंवा चौद्हवि का चांद हो या आफताब हो तसेच भवरा बदा नादान है सारखी अविट संगीताची गाणी त्यांचाच चिञपटातील आहे दुर्दैवाने त्यांनीच चिञपटाच्या दुनियेत पुढे आणलेल्या वहिदा रहेमान पत्नी गीता दत्त यांचा काञीत ते अडकले त्यांचा अंत झाला काही वर्षापुर्वीच त्यांचा मुलाचे किडनी फेल होउन पुणे येथे निधन झाले ते गुरूदत्त नावाने प्रसिध्द झाले असले तरी ते बंगाली नाही ते महाराष्टीयन होते कोल्हापुरचे होते त्यांचा मिस्टर अँड मिसेस1955 हा चिञपट पण मस्तच होता. गुरूदत्त यांचा अपवाद वगळता ईतर जूने ब्लँक अँड व्हाईट चिञपट बघताना मला तरी बोअर होते माञ गुरुदत्तांचा कोणताही चिञपट एकदा बघून संपला असे होत नाही बहुना दरवेळी आपण कोणतातरी नविन चिञपट बघत आहोत असे वाटते दरवेळी त्यांचा चिञपटातून निदान मला तरी जीवनविषयक नविन पैलू कळतो मी आतापर्यत किमान /७ वेळा प्यासा चिञपट बघीतला असेल पण मला तो पुर्ण कळाला असे म्हणने धाडसाचे ठरेल 
                                 जरी सत्यजीत ये यांना आँस्करतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असला तरी टाईम्स मँगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वोतक्रुष्ट चिञपटाच्या यादित प्यासा या चिञपटाची निवड केली यातच त्यांचे मोठेपण दिसते गुरुदत्त भारतीय चिञपटातील एक हिरा होते आचार्य अञेंच्या भाषेत बोलायचे झाल्यास गेल्या दहाहजार वर्षात असा अभिनेता दिग्दर्शक निर्माता झाला नाही पुढील दहा हजार वर्षात होणे नाही .
                     सिनेमा तयार करण्याचा पघ्दतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न्‍ असे. कॅमेराच्या उत्क्रष्ट उपयोजन करण्याबाबत त्यांचा हातखंडा होता. पात्राच्या पडणाऱ्या सावल्यांचा उपयोग करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. कागजं के फुल या चित्रपटात त्याचा आपणास प्रत्यय येतो. वक्तने किया  या गाण्याचा सूरवातीला आपणास जो स्टुडिओ चा सेट दिसतो त्यावर आपणास त्यांचा दिग्दर्शनातील हेकूमत दिसून येते . प्यासा या चित्रपटात कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे पालकत्व आपल्याकडे न घेण्याचा समाजातहल द्रुष्टीकोन ठळकपणे आपणास दिसतो. गुरूदत्त्‍ यांच्या कार्यकाळाचे ठळक दोन कालखंडात विभाजन करता येते. 1943 ते 1953 पर्यतच्या पहीला कालखंड ज्यामघ्ये त्यांनी सुप्रसिध्द अस्या प्रभात फिल्म्‍ कंपनीत आपल्या सिने कारकर्दीला कोरॉग्राफर म्हणुन सूरवात केली. त्यानंतर 1953 ते त्यांचा अंतापर्यतच्या कारकर्दीच्या समावेश होतो. जो कालख्ंड गूरूदत्त्‍ फिल्मचा कालखंड म्भ्णुन ओळखला जातो.  बाझी हा गुरूदत्त्‍ फिल्मचा पहिला चित्रपट भारतीय सिनेस्रूष्टीचा सुवर्णकाळ म्हणून तो आपणास परिचित्र आहे.
त्याचा चित्रपटांची यादी आपण आता बघु 
                    गुरूदत्त्‍ हे फक्त्‍ उत्क्रूष्ठ चित्रपट निर्मातेच नव्हते तर दिलदार मित्र सुध्दा होते . जॉनी वॉकर या आपल्या मित्राला त्यांनी अनेक चित्रपटातून संधी दिली . त्यांनी अनेक नवोदितांना सुध्दा ब्रेक दिला .ज्यामध्ये सूरवातीला गूरूदत्त्‍ फिल्म मध्ये पटकथालेखक म्हणून कार्यरत असणारे आणि कालांतराने सिनेदिग्दर्शक म्हणून काम बघणारे अरबार अल्वी किंवा त्यांचा आयूष्यातील वादळास कारणीभूत ठरलेली वहिदा रेहमान ही त्यापैकी काही महत्त्वाची नावे  .

वहिदा रेहमान यांचे वडील आय सी एस अधीकारी होते . त्यावेळच्या मद्रास प्रांतात त्यांची नेमणूक करण्यात आली होती . तत्कालीन मद्रास प्रांतांत सघ्याचा आंध्रप्रदेश तेलंगणा आणि तामिळनाडू राज्याचा समावेश होतो . या प्रंतात सातत्याने बदली होत असल्याने त्याचा व्यक्त्ीमत्तवर याचा सकारातम्क परीणम झाला वहिदा रेहमान यांच्या सिने स्रूष्टीतील प्रवेश तेलगु चित्रपटामार्फत झाीला. त्या उत्क्ुष्ट नुत्यांगंणा होत्या . एकदा काही कामानिमित्य गुरूव्‍दत्त्‍ हैद्राबाद येथे गेले असता मिळालेल्या मोकळया वेळेचा सदूपयोग व्हावा याहेतूने आयोजकांनी त्यावेळच्या  चित्रपटातग्रूहातीलां गर्दी खेचणाऱ्या तेलगू चित्रपटातील ‍अभिनेत्रीची भेट घालून दिली त्याच  वहिदा रेहमान .वहिदा रेहमान त्यावेळी 16/17 वर्षाच्या होत्या  वहिदा रेहमान यांनी गुरूदत्त्‍ फिल्मच्या सी आय डी या चित्रपटाव्दारे हिंदी चित्रपटस्रुष्टीत पदार्पण केले.  गूरुदत्त्‍ फिल्म प्रॉडक्शनच्या प्यासा या चित्रपटाव्दारे त्या विख्यात झल्या. नंतर त्यांनी विविध चित्रपटात भुमिका केल्या . गाईड या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पूरस्कार मिळाला. आतापर्यत त्यांना दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना पदमश्री आणि पदमविभुषण्‍ पुरस्कार देउन त्यांचा गौरव भारत सरकारकडून करण्यात आलायं. त्यातील प्रमूख चित्रपट हे गुरूदत्त्‍ फिल्मचेच होते. वहिदा रेहमान यांच्या कारकर्दीचे दोन टप्पो पडतात .पहिला टप्पा हा त्यांचा सुरवातीपासून 1975 पर्यत आहे दूसरा टप्पा 2000 ते 2010 पर्यत आहे. वहिदा त्यांचा पालकांचे शेंडेफळ आहे. त्यांना त्याच्यापेक्षा मोठया 3 बहिणी आहेत. वहिदा आपल्या मतांविषयी ठाम असतात . हा ठामपणा त्यांचा आयूष्यात पहिल्यापासून आहे. गुरूदत्त्‍ फिल्म मध्ये सुरवातीला करार करताना त्यांनी आपल्या करारीपणाचे दर्शन गुरूदत्त्‍ यांना दाखवले. किंबहूना याकरारीणामूळेच गुरुदत्त त्यांच्या आकर्षिले गेले असावेत . गूरूदत्त्‍ यांच्या बरोबर बराच काळ व्यतीत केलेल्या अरबार अल्वी यांनी त्यांचा गूरूदत्त यांच्याबरोबरच्या आठवणी एक्सप्रेस ग्रूपच्या माजी पत्रकार सत्या सरन यांच्या बरोबर शेअर केल्या आहेत , ज्याचे ten years with gurudutt नावाचे पुस्तक आहे. त्यात सांगीतल्याप्रमाने वहिदा रेहमान यांनी पहीला करार करताना देखील पोशखापासून आपला हेका कायम ठेवला होता . गुरूदत्त्‍ फिल्म्चा लोकांना त्यांचे नाव योग्य न वाटल्याने दिलीपकूमार यांच्यप्रमाने बदलण्याचे ठरवले त्याला पण्‍ त्यांनी विरोध केल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. वहिदा रेहमान यांच्या आईने त्यांच्या प्रेमप्रकरणला पिरोध केला आणि इतिहास काय घडला हे सर्वश्रूत आहेच.
          गुरूदत्त्‍ यांची धर्मपत्नी गीती दत्त्‍ यांची कहाणी काही वेगळीच दुर्देवी आहे. या व्याखनाची तयारी करताना ऐकलेल्या एका यूटयूब चॅनेलनूसार गीती दत्ता या गायीका क्षेत्रातील मधूबाला आहेत . ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मधूबाला अभियानाच्या क्षेत्रात जास्त्‍ पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला. गीता दत्त यांच जन्म सघ्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले . त्याचा सिनेकारकर्दीची सूरवात 1946 च्या आसपास होते. फारसे गायकीचे शिक्षण न घेता अंगभूत असणाऱ्या गूणाव्दारे त्यानी सिनेगायकीय सूरवात केली . बाझ या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची ओळख गूरूदत्त्‍ यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर लवकरच प्रेमात होउन त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना 3 अपत्ये झाली तरूण आणि अरूण्‍ ही 2 मुले आणि एक मूलगी ही त्यांची अपत्ये त्यतील तरूण्‍ याचे 1985 ला निधन झाले. 2014 साली त्यांच्या अरूण्‍ या मूलाचे पुण्यात वयाच्या 60 व्या वर्षी किडनी फेल होडन निघन झाले. स्व्त: गीता दत्त 1972 साली अत्यंत दुर्देवी स्थितीत गेल्या . 1964 च्या त्या दुर्छेवी घटनेतून स्वत: सावरण्यासच त्यांना कैक महिने लागले . त्याना गूरुदत्तच्या अकस्मीत जाण्याचा इतका गंभीर धक्का बसला की काही स्वत:च्या मूलांना देखील ओळखत नसल्याचे उललेख आहेत . याधक्यातून सावरताना त्यांना मद्य सेवनाचे व्यसन लागले. त्यातून उदभवलेल्या आजारातून त्यांनी जगाचा निरोप घेतला . त्यंची गाजलेली गाणी म्हणजे चौदहवी का चाँद. त्यांच्यात खूच गूणवत्त असून देखील गुरूदत्त्‍ यांच्या आग्रहरस्त्व त्यांनी गुरूदत्त्‍ फिल्म्‍ प्रॉडक्शनशिवाय अन्यत्र फारशी गाणी गायली नाहीत. गुरूदत्त यांच्या जीवनप्रवास या दोन व्यक्तींशिवाय पुर्ण होणे अशक्याच गूरूदत्त्‍ यांच्या सुखद:खाशी वहिदा रेहमान आण्‍ि गीता दत्त्‍ पुर्णत:जोडल्या गेल्यात एकीचा उल्लेख्‍ आल्श्यावर दूसरीचा उल्लेख येणो क्रमप्राप्त्च आहे. या दोघींच्या प्रेमाच्या कात्रीत सापडून त्यांचा दुर्देवी म्रुत्यू झाला. एक त्यांची लग्नाची बायको होती जिच्याशी वैचारीक मतभेदामूळे त्यांचा वैवाहिक आयूष्यात प्रचंउ वादळे आली. परीणमीते आपल्या पत्नीपासून मनाने दुरावले..त्या मनाच्या पोकळीत शिरली ती वहिदा रेहमान . गुरूदत्त्‍ आणि गीता दत्ता यांच्यातील मतभेद इतके वाढले की गुरूदत्त्‍ यांच्या अखेरच्या दिवशी अर्थात 9 ऑक्टोबर 1964 ला गुरूदत्त्‍ यांनी ‍निर्वाणीचा इशारा देउनही गीता दत्त यांनी आपल्या मूलांना गूरुदत्त यांना भेटू दिले नाही ते भेटू दिले असते तर चित्र काहिसे वेगळे दिसले असते यात शंका नाही . अर्थात मानवी आयूष्यात जर तरला किती महत्व असते हे आपण जाणतातच. मी काही वेळापुर्वी उल्लेख्‍ केलेल्या अकबर अल्वी यांनी कथन केलेल्या आणि सत्या सरन यांनी लिहलेल्या ten years with gurudutt या पुसतकात सदर प्रसंग खुप विस्ताराने लिहला आहे. त्या पूसतकाची सूरवातच या प्रसगापासून होते. गुरूदत्त्‍ यांचया ‍निधनामूळे आपल्यातून एक मनस्वी हळव्या मनाचा कलांवंत आपल्यला सोडून गेली त्यामूळे चित्रपट स्रूष्टीचे कधीही भरून न निघणारे नेकसान झाले.
               या मघ्ये कोणला दोषी ध्ररणे अवघड आहे. आजपासून पन्नास वर्षाआाधचा काळ होता तो. आजच्या काळात देखील आंतरजातीय लग्न केले या कारणस्तवाव विववहीत जोडप्याना होणरा त्रास आपण्‍  सैराटच्या माघ्यमातून बधतोच . त्यातही वहिदाच्या प्रेमात पडण्याचा वेळेस गूरुदत्त्‍ विवाहीत होते. त्यांचा घटस्फोट झालेला नव्हता .त्यामूळे वहिदांच्यस आईचा विरोध अनाठायी नव्हता असे ठामपण्े म्हणता येते. आणि प्रेम ही मनाची एक भावना आहे . प्रेम कधीही व्यकतीचे वय धर्म जात बघून होत नसते हे आपणस माहिती आहेच. त्यामूळे या प्रेकरणत गूरूदत्त्‍ यांचा पण्‍ दोष्‍ आहे असे म्हण्ता येत नाहि ण्‍ मग यात दोष्‍ कूणचा गीता दत्त यांचा म्हणवा तर गुरूदत्त्‍ त्यांचा लग्नाचा नवरा होता हिंदू हितीनूसार आयूष्यभराची साथ देण्याचे आश्वासन गूरूदत्त्‍ यांनी ‍दिले होते. त्यामूळे या बबतीत त्यानाही दोषी मानजा येणर नाही. त्यामेूळे या घटनेक्डे एक अपघात म्हणूनच बधने संयूक्तीक ठरेल असे मला वाटजे.
त्यांचा म्रूत्यू जाणून बुजून केलेली आत्महत्या की नैराश्यामूळे मानची विचार करण्श्याची स्थिती बिघ्डल्यामूळे किती झेपेच्या गोळया हे लक्षात न आल्याने झालेला अपघात होता या बाबात मात्र शंकेला वाव आहे.आणि येणऱ्या माझ्यायारख्या पिढीला हा वाव इेवूनच मी आपली रजा घेतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?