आजचे बालसाहित्य

                         मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल . ठकठक मध्ये शेवटच्या पानावर येणाऱ्या टिमू या कुत्र्याच्या करामती तसेच त्यांनी राबवलेले लिहिते व्हा हा उपक्रम मला खूपच आवडायचा . चांदोबातील फोटो जुळवा स्पर्धा , सामान्यज्ञान स्पर्धा , काही औरच होती . एकाचवेळी जवळपास सर्वच  भारतीय भाषधांमधून प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मासिकामध्ये त्याचा अग्रक्रम लावायलाच हवा . ती परंपरा सध्या चंपक चालवत आहेचंपक मधील चिकू य सस्याची गोष्ट मला आवडायची . . रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय . दोन दिवसापूर्वी नाशिक येथील कॅनडा कॉनर येथील सुप्रसिधद अश्या एका पेपर स्टॉलला भेट दिली असता तिथे असणाऱ्या व्यक्तीला विचारले चांदोबा ठकठक आदी मासिक कुठेय ? त्यांनी सांगितले ती मासिक कधीचीच बंद झालीय किशोरचा फक्त दिवाळीला बालसाहित्याचा अंक येतो . सध्या फक्त तू म्हणतो आहेस त्यातील चंपक विक्रीस उपलब्ध आहे.
                       जुने मासिके बंद झाले तरी नव्याने सुरु झाली असतील काही कॉमिक्स या समजुतीतून मी पुढे विचारले , बरे ती बंद झाली असतील तर छोटा भीम , निंजा हतोरी,  डोरेमॉन या  सध्याचा काळातील सुपर हिरोंचा नावाने एखादे कॉमिक्स सुरु असेल ना ? माझ्या या प्रश्नावर देखील त्याने नकारघंटा बजावत सांगितले ती फक्त टीव्हीवरील सुपर हिरो आहेत . त्यांच्या नावाने एखादेपण कॉमिक्स निघत नाही . मी लहानपणी चाचा चौधरी और साबू या कॉमिक्स चा चाहता होतो . त्या वेळेस मी त्याचे अनेक अंक जमवून ठेवले होते . कालांतराने मी ते फेकून दिले . असो


               नाही म्हणायला त्यांनी मला काही अमरकथा चित्राचे काही अंक काढून दिले आणि सांगितले चांदोबा काळाचे हे अंक सध्या मिळतात , मात्र ते देखील सहजतेने आंही नाही पण   मिळताय



             आपल्या कडे वाचनाचे महत्व अनन्य साधारण असल्याचे सांगितले आहे . मात्र सध्याची परिस्थिती बघता हे कसे काय शक्य आहे . बाळ मानसशास्त्रानुसार मुले अनुकरणीय असतात . मोठे जे करतात त्याचाच कित्ता मुले गिरवतात . ते बघता मोठ्यांना  वाचताना बघितले तर लहानांनी काय वाचायचे ? मोठ्यांची पुस्तके , लहान मुलांच्या भावाविषयासी एकरूप होतील अशी पुस्तके सध्या का दिसत नाही . निदान मला तरी आढळलेली नाही . माझे निरीक्षण परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही . किंबहुना ते अपूर्ण चुकीचेच असल्याचे म्हंटले तर वावगे ठरणार आंही .
                         पुण्यातील चपराक नावाचे एक प्रकाशक , तसेच साने गुरुजींनी सुरु केलेले साधना या साप्ताहिकातर्फे काही प्रमाणात बाल साहित्याची निर्मिती केली जाते असे ऐकिवात आहे , खरे खोटे देवाला माहिती .





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?