कलम ३७१, मराठवाडा आणि दुष्काळ

                     
आपल्या भारतीय संविधानातील कलम ३७० विषयी अत्यंत तावातावाने बोलले जाते .सध्या त्याची उपयुक्तता नाही अशा असा सर्वसाधारण सूर असतो. मात्र या सुप्रसिद्ध अश्या कलम ३७० नंतर लगेच असणाऱ्या कलम ३७१ विषयी  काहीही बोलले  जात नाही , किंबहुना भारतीय संविधानात विशेष तरतुदी फक्त कलम ३७० नुसार फक्त काश्मीर विषयीच केलेल्या आहेत असा सर्वसाधारण सूर असतो . मात्र असा सूर लावणाऱ्या बहुतेकांना माहित नसते की आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्याविषयी विशेष तरतुदी ह्या भारतीय संविधानाच्या कलम ३७१ नुसार केलेल्या आहेत . मात्र त्याचा किती फायदा अथवा तोटा झाला ? याविषयी कोणीच बोलत नाही . माझे आजचे कथन याचा फायदा तोटा मांडण्यासाठी
                                 सध्या मराठवाड्याच्या दुष्काळासंबंधी विविध स्तरावर चर्चा होत आहे . मराठवाड्याचा दुष्काळ अत्यंत गंभीर आहे. मात्र हि स्थिती काही अचानक आलेली नाही . अनेक वर्षाच्या घटनेचा  दृश्य स्वरूपातील परिपाक म्हणजे सध्याची परिस्थिती  होय . यामध्ये कलाम ३७१ नुसार होणे सक्तीचे असणारी मात्र न झालेल्या कामांचा मोठा वाटा आहे.  कलम ३७१ नुसार मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी एक आणि फक्त मराठवाड्यासाठी एक अशी दोन विकासमहामंडळे स्थापन करणे अत्यावश्यक आहे . दोघांच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे राज्यपाल असतील अशी घटनेत तरतूद आहे. प्रत्येक वर्षी या विकास महामंडळाची बैठक होणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये विकास कामाच्या प्रगतीबाबत विचारमंथन होणे आवश्यक आहे,मात्र या विकास महामंडळाची गेल्या कित्येक वर्षात बैठक झालेली नाही . ती कोणत्या पक्षाच्या  राजवटीत बंद पडली , कशी बंद पडली यावर भाष्य करून मी याला पक्षीय रंग देऊ इच्छित नाही . मला एव्हढेच म्हणायचे आहे की मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाचा फारशा परिणाम झालेला नाही . औरंगाबादला आणि लातूरला यासाठी विशेष सोइ केलेल्या आहेत. ज्या कित्येक वर्ष न वापरता पडून आहेत . मराठवाड्यातून अनेक जण मुख्यमंत्री आणि केंद्रात  मोठ्या   मंत्रालयाचे  मंत्री झाले आहेत त्यांचे प्रयत्न मात्र कमी पडले हे मात्र नाकारून चालणार नाही .
          या विकासमहामंडळामार्फत मराठवाड्याची औद्योगिक आणि क्षेत्री क्षेत्रातील प्रगती होणे आवश्यक असताना दोन्ही पातळीवर मराजवाड्यातील जनतेची फसवणूक झाली हे कटू  असले तरी सत्य आहे  हे नाकारून चालणार नाही .
    
   मराठवाड्यातील रेल्वेप्रकल्प अत्यंत कूर्म गतीने चालू आहेत . ज्यामध्ये अहमदनगर बीड हा रेल्वमार्ग प्रमुख आहे . मराठवाड्यातील महत्तवाचा लोहमार्ग असणारा औरंगाबाद ते नांदेड हा लोहमार्ग त्यांचा क्षमतेचा १५०% भर वाहतोय . एकेरी मार्ग डिझेलवर चालणाऱ्या गाड्या रेल्वेचा वेग मंदावतात . मराठवाड्यातील दुसरा लोहमार्ग असणारा कुर्डुवाडी लातूर परभणी हा लोहमार्ग आताआता पर्यंत अरुंद होता आता कुठे  त्याचे रुंदीकरण झाले  आहेत रस्त्याची  स्थितीपण फारसी अनुकूल नाहीये . महाराष्टातील काही रस्त्यांना राष्टीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने सध्या मराठवाड्यात काही प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग दिसत आहे . मात्र ते पुरेसे नसल्याने मराठवाड्यात औद्यगिकीकरण होऊ शकत नाहीये . जोडीला खंडांतर्गत भाग आणि जवळपास मोठी डोंगरांग नसल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे . परिणामी शेती फारशी अनुकूल नाहीये .
                      भारताला स्वतंत्र मिळाल्यावर पूर्ण एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी स्वतंत्र मिळालेल्यामराठवाड्याचे दुःख जेव्हा संपेल तेव्हाच कार्य अर्थाने महाराष्ट्र आणि भारत  खऱ्या अर्थाने विकसित होईल यात शंका नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?