105 वर्षानंतर

   
        28 जून 1914 साली एका सर्बियन नागरीकाने आस्ट्रियन राज्यपुञाची हत्या केली आणि  पहिल्या महायुध्दाची सुरवात झाली त्याला 2019 साली 105 वर्षे पुर्ण होतील या 105 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे 

              पहिल्या महायुध्दानंतर युरोपीय राष्टांनी ज्या जर्मनीवर अपमानास्पद अटी घातल्या त्याच  जर्मनीचा पाया  आता युरोपीय राष्टे पडत आहे त्यास कारण आहे  ते म्हणजे  ब्रेझिट  नतंर युरोपातील सर्वात मोट्या आकाराची अर्थव्यवस्था असणे , याच जर्मनीने पिग्स राष्टांच्या समस्येतही युरोपीय राष्ट्रांची २०१५ साली मदत केली होती . जगात कोणतीच गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते याचेच हे द्योतक समजता येईल .   युरोपीय राष्टे अश्या प्रकारे युध्द करतील अशी शंका शका19शतकाच्या अखेरीस आणि  20व्या शतकाच्या सुरवातीस स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केली होती.  येत्या बुधवारी  (4 जूलै 2019) त्यांची 116वी पुण्यतिथी आहे ,त्या वेळेस या विषयी अधिक बोलेल. 
              तर पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीवर लादलेल्या अपमानास्पद अटी त्यातून राष्ट्रीयत्वाची जर्मन्स मध्ये आलेली प्रखर भावना त्यातून निर्माण  झालेला हिटलरचा उद्य त्याने केलेले अत्याचार (त्या विषयीचे डायरी आँफ अँनफँक  हे पूस्तक मी वाचले आहे. अंगावर शहारे आणणारा अनुभव  होता तो ) त्यामुळे  होणारे जर्मनीचे तूकडे  शीतयुध्द  जगाचे 3 ठिकाणी विभागणे  (सयुक्त संस्थाने अमेरीकेचा भांडवलशाही गट    मला का असे वाटते ते मी सांगू शकत नाही कदाचित या काळात घडलेल्या गोष्टीविषयी वाचलेल्या गोष्टीमुळे मला असे वाटत असेल (या कालावधीतच माझा जन्म झाला पण या काळातील मला काही आठवत नाही मला नारायण राणे मुख्यमंञी झाल्यापासूनचे आठवते त्या आधीचे काहा संदर्भ लिखाणात आल्यास तो वाचलेल्या ठिकाणचा आहे असे समजावे आणी चुकल्यास माफ करावे ) पण 1988 पासून 1994 पर्यतची वर्षे मला आता जाणता वयात पुन्हा अनूभवयास मिळावीत असे वाटते ईतिहासाची पुनरावत्ती होते असे म्हणतात बघू या ईतीहिसाची पुनरावत्ती कधी होते हे 
यूनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट  रशियाचा  कम्युनिष्ट गट आणि बुध्द फिलॉसॉफीशी साध्रम्य सांगणारा भारताचा  नामचा गट.   बहूतेक ठिकाणी नामला बाजूला काढतात.  माञ मी एक अवलीया असल्याने मी ते करू शकत नाही.  बाकीच्या दोन्ही गटांनी नाटो व सिटो सारखे सैन्य उभारले विविध करार केले . माञ नाम राष्टांनी असे करार केल्याचे मला तरी माहिती नाही  )आणि  1990 च्या नंतरचे  जग ज्यात आपण सध्या  रहात आहोत .
 या सहा वर्षात जगात आणी भारतात प्रचंड बदल झाले . भारताच्या गोष्टी आपणास माहिती आहेच जूलै 1991 रोजी भारतावर कोसळलेले आर्थिक आरिष्ट  लालक्रुष्ण अडवाणींची रथयात्रा  काश्मीरचे अस्थीर होणे,  लूक ईस्ट पॉलीसी अयोध्देतील वादगस्त धार्मिक स्थळाचा विध्वंस मुंबईतील दंखली  आणि  संबधीत गोष्टी तर जगात  रशियाचे अफगाणीस्तानवर आक्रमण त्याला काटशह देण्यासाठी अमेरीकेची  तालीबानची निर्मीती   (भारतात आणि जगात दहशतवाद यानंतर  सूरु झाला  )रशीया ची मक्तेदारी संपणे जर्मनीचे एकीकरण अश्या प्रचंड गोष्टी या कालावधीत घडल्या.  सध्याचा अनेक आंतरराष्टीय राज्यकारणाचे संदर्भ या घटनेसी संबधीत आहे.  या चा नंतर च्या काळाचे 1990 ते2000 व 2000 ते  सद्यस्थितीपर्यत असे दोन भाग पडतात.  1990 ते2000 पर्यत जग एक ध्रूवी होते 2000नंतर जग बहू ध्रुवी बनले आणी भारताचा एक महासत्ता म्हणून उदय होण्यास सुरवात झाली,  जी सध्या सुरु आहे.  आता आपण दक्षीण आशियातच नव्हे तर संपुर्ण आशीयात मानाचे स्थान मिळवले आहे व जागतीक स्थान मिळवण्यासाठी आपली वाटचाल सुरु आहे . या महासत्तेचा उभारणीचा वाटचालीत आपली वाटचाल आर्थिक महासत्ता म्हणून होइल भारताला  सद्य स्थितीत लष्करी महासत्ता बनण्यासाठी प्रचंड प्रमाणात कष्ट घ्यावे लागतील आणि  सध्या भारत त्या साठी काही प्रयत्न करत आहे, असे मला तरी वाटत नाहीये .  माञ माझ्यामतापेक्षा भविष्याचा पेटाऱ्यात काय आहे हे काळालाच ठरवू देणे योग्य नाही का ? तसे यावर खुप काही बोलता येवू शकते माञ सध्या थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत  राम राम
              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?