इसवी सन 1972 च्या पानावरून पुढे चालू

                                   स्वातंञ्योत्तर भारताचा इतिहासात जे जे मोठे नैसर्गिक संकट आले त्यामध्ये 1972चा दुष्कळाचा समावेश करावाच लागेल . यावेळी लोकांना खायला अन्न न मिळाल्याने अनेक लोक निधन पावले . सध्या या दुष्कळाचा कहाण्या सांगितल्या जात आहेत .माञ त्यावेळेस लोकांना पिण्यासाठी पाणी होते , खायला अन्न नव्हते . तर आता खायला अन्न प्रचंड आहे पण पिण्यासाठी पाणी नाहीये . तसे बघायला गेले तर भारतात दर काही वर्षांनी मोठा दुष्काळ पडतोच . संत तुकाराम महाराज किंवा देव मामलेदार  महाराज यांच्या काळातील दुष्काळ प्रसिध्द आहेच . ब्रिटिश भारतात ( वसाहातवादी कालखंड )19व्या शतकाच्या अखेरच्या दोन शतकात भारतात प्रचंड दूष्काळ पडला होता . त्याचे ह्रुद्य द्रावक वर्णन इतिहासाची डाव्या नजरेतून मांडणी करणार्या जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) येथील प्रसिध्द इतिहाससंशोधिका रोमीला थापर यांच्या पुस्तकातून दिसते .याच काळात दुष्काळाच्या प्रश्नासाठी स्ट्रँची कमिशन नेमले गेले होते ज्याने अनेक उपयुक्त सुचना केल्या होत्या . 
              भौगोलिक दुष्ट्रा विचार करता जगात दरवर्षी कोठे ना कोठे दूष्काळ पडत असतो . भारतातील मान्सूम चा अंदाज शास्ञीय ठोकटाळे बांधून देणे अतिशय अवघड आहे . भारतीय मान्सूम वर परीणाम करणारे 17 घटक सध्या माहिती आहेत . यातील काही घटकांचा भारतीय शास्ञाज्ञांनी विशेष अभ्यास करून सध्या अंदाज व्यक्त केला होता . काहींचा अभ्यास युनाटेड स्टेटस आँफ अमेरीका या देशातील शास्ञज्ञांनी केला. (मी माहिती आहे अशी वाक्यरचना करतोय हे लक्षात घ्या सध्या
माहिती नसणारे घटक पण असू शकतात ) सध्या त्यापैकी अल निनो आणी ला निनो हे घटक विशेष प्रकाशझोतात आहेत. जे आॉस्टेलियाच्या पुर्व अथवा दक्षीण अमेरीकेच्या पश्चीम किनार्याच्या लगतच्या प्रदेशात आढळतात . प्रुथ्वी गोल आहे हे सर्वांनाच माहिती आहे आता अशी कल्पना करा की आपल्या भारतातून आपण खोल खड्डा खणायला सुरवात केलीये .जो प्रुथ्वीच्या केंद्रातून पार होउन प्रुथ्वीच्या दूसऱ्या  टोकातून बाहेर पडेल . त्यावेळेस आपण दक्षीण अमेरीकेच्या मध्य भागात पोहचलेले असू . म्हणजे आपल्या जवळपास दूसऱ्या  टोकाला या प्रसिध्द समुद्रप्रवाहांचा भुभाग आहे .तरी तो आपल्या मान्सुमवर परीणाम करतोय.
                                  आता वर्तमानकाळाचा विचार करता नाशिकच्या  वायव्येला असणारे पाणी जे  पुर्णत: गुजरात वापरत आहेत . ते  निफाड मार्गे मराठवाड्यात पा काही प्रमाणात वळवले पाहिजे . असे मला वाटते . हे पाणी लगेच जाणार नाही हे मला माहिती आहे , पण भविष्यात अशी परीस्थिती निर्माण झाल्यास नक्की वापरता येइल . भौगोलिक परीस्थितीचा विचार करता यूनोचा मते बायो डायव्हरसेटीचा अनुषंगाने मोस्ट सेंसिट्व्ह असणार्या आर्यावताचा पश्चिमेकडच्या भागातून इथे पाणी आणण्यापेक्षा हे कमी हानी कारक आहे . असो यावर खुप काही बोलता येइल पण तूर्तास थांबतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?