35 वर्षानंतर

     
                            जून महीना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीची आठवण होण्यास सुरुवात होते.  ज्यांनी परीक्षेचा वेळी फारशा अभ्यास केला नसतो अशा विद्यार्थांना परीक्षेच्या वेळी केलेल्या उचापतींची आठवण होते.  स्थानिक स्वराज्य संस्थाना नाले साफ न केल्याची आठवण होते . तसेच काही जणांना 25 जून1975 आणि  3जून 1984 ची आठवण होते.  भारताचा स्वातंञ्येतर राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरणाऱ्या घटना या दिवशी घडल्या, ज्यांनी भारताचा वाटचालीला एका दिवसात बदलून टाकले. ,  25 जून1975 ला भारतात राजकीय आणीबाणी लादली गेली,  ज्यात तुरुगांत गेलेल्या लोकामधून आताचे विविध राजकारणी उदयास आले जसे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे लालूप्रसाद यादव मुलायमसिंग वगैरे किंवा आताचे विविध पक्ष तयार झाले जसे समाजवादी पक्ष भाजपाचा वडील पक्ष असणारा जनसंघ आदी पक्ष .
                        आणि  3जून 1984च्या दिवशी झालेली आँपरेशन ब्ल्यू स्टार घटना ज्याची परिणीती भारताला पहिल्यांदा अस्थीर करण्यात झाली . कनिष्क विमान दुर्घटना ही या सर्व घटनाक्रमातील महत्तवाची घटना आहे, आणि  ही घटना कँनेडाशी संबधित आहे ज्या कँनेडात काही वर्षापुर्वी कामत गारू ही घटना घडली होती आणि ती पण एकाच समाजाबाबत.  आँपरेशन ब्ल्यू स्टार इंदिरा गांधी यांची हत्या व त्यानंतर उसळलेल्या दंगली,  राजीव गांधी यांचा राजकारणातील प्रवेश आणि त्यांचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीनी आता मिळावलेल्या जागांपेक्षा जास्त जागा जिकंत पंतप्रधान बनणे . त्यांनी काळाची गती ओळखून केलेल्या सुधारणा सर्वच घटनांमुळे भारत ढवळून निघाला हे माञ नाकारता न येणारे सत्य आहे
                            या घटनेचे वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्रेसने खेळलेल्या पण फसलेल्या चालीचे अपत्य म्हणजे म्हणजे खलीस्तान चळवळ ज्यामुळे भारताच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला.  परिणामी एका शुर लढवय्या समाजाच्या प्रार्थना समाजात लष्कर घुसवावे लागले ज्याची परिणीती महात्मा गांधीच्या हत्येनंतर ज्या प्रकारे एका समाजाला लक्ष्य करण्यात आले त्याची पुनरावत्ती करण्यात झाली.  मी त्या काळी सध्याचा जन्मात तरी अस्तिवात नव्हतो मागच्या जन्माच्या काळात जर घडत असेल तर माहीती नाही हे सर्व त्या काळी लिहलेल्या व मी वाचलेल्या आणी तो काळ अनूभवणाऱ्या कडून याविषयी सांगीतल्या गेलेल्या गोष्टीवर आधारीत आहे तरी काही चुका झाल्याच आहेत असे वाचणाऱ्यांनी समजायला हरकत नाही मला जेव्हढी माहीती आहे ...


                            या घटनेचे वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्रेसने खेळलेल्या पण फसलेल्या चालीचे अपत्य म्हणजे म्हणजे खलीस्तान चळवळ ज्यामुळे भारताच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला.  परिणामी एका शुर लढवय्या समाजाच्या प्रार्थना समाजात लष्कर घुसवावे लागले ज्याची परिणीती महात्मा गांधीच्या हत्येनंतर ज्या प्रकारे एका समाजाला लक्ष्य करण्यात आले त्याची पुनरावत्ती करण्यात झाली.  मी त्या काळी सध्याचा जन्मात तरी अस्तिवात नव्हतो मागच्या जन्माच्या काळात जर घडत असेल तर माहीती नाही हे सर्व त्या काळी लिहलेल्या व मी वाचलेल्या आणी तो काळ अनूभवणाऱ्या कडून याविषयी सांगीतल्या गेलेल्या गोष्टीवर आधारीत आहे तरी काही चुका झाल्याच आहेत असे वाचणाऱ्यांनी समजायला हरकत नाही मला जेव्हढी माहीती आहे त्यानुसार हे लेखन केले आहे . 

.                   पंजाबचे भौगोलिक स्थान जर विचारात घेतले तर आपणास एक गोष्ट सहज लक्षात येते,  की पंजाब मधून सहजतेने काश्मीर मध्ये जाता येते काश्मीर ला लागून असणाऱ्या  हिमाचल प्रदेशातून काश्मीरमध्ये जाणे फारशे सोपे नाही.  आताआतापर्यत म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वीपर्यत तो प्रदेश वर्षातील 8 महीने बफाच्छादीत असल्याने त्याप्रदेशात जाता सुध्दा येत नव्हते.  आता त्याप्रदेशात थोड्या खालचा प्रदेशात बोगदा झाल्याने आता हा मार्ग वापरता येतो,  हा मार्ग जगातील सर्वात उंच गाडी रस्ता आहे.  तेथील हवेत प्राणवायुचे प्रमाण अत्यल्प आहे.  म्हणजेच तेथून काश्मीरचे नियंञण करणे अवघड आहे.  जर दुर्दैवाने पंजाब स्वतंञ्य झाले असते तर आपणास काश्मीर वर नियंञण ठेवणे अवघड झाले असते,  आणि  आपण काश्मिरमधील दहशतवादी कारवायांचा आढावा घेतला तर आपणास असे लक्षात येते की,  पंजाब शांत होतो ना होतो काश्मीर पेटण्यास सुरवात झाली त्यामुळे आपण कितीही नाराज असलो तरी गांधी नेहरू घराण्यातील इंदिरा गांधी यांनी देश फुटण्यापासून वाचवला हे माञ नाकारून चालणार नाही तो प्रश्न अजून पुर्णपणे मिटलाय असे म्हणता येणार नाही त्या प्रसंगातून उदभवलेल्या दंगलीत होरपळलेल्या समाजाला अजून

पुर्णपणे न्याय मिळालेला नाही तसेच मी एके ठिकाणी  ती परिस्थिती परत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वाचले होते.  अर्थात ते परदेशातील आहेत भारतातील नाहीत.  मला माहीती आहे की काही ठिकाणी त्यास वंदनीय मानले जाते माञ हे फारसे चिंतेचे कारण नाही आपल्या महाराष्ट्रात सुध्दा एक विशिष्ट विचारधारा अश्याच एका माणसाला आपला आदर्श मानतेच ना ? तेव्हा सर्व ठिकाणी असे लोक असतात त्याचा बावू करण्याची गरज नाही.  इशान्य भारताला सुध्दा वेगळे होण्याची त्यामुळे चालना मिळाली असती माञ आपल्या सुदैवाने ते झाले नाही भारत एकसंधच राहिला तसेच पाकिस्तानला पण 1971 चा अपमानाचा बदला घेतल्याचा आनंद मिळाला असता तो मिळाला नाही.  पण पाकीस्तानला भारताला अस्थिर करण्यासाठी एक उपाय सापडला,  या कालावधीनंतर जगाच्या राजकारणात प्रचंड मोठे बदल झाले माञ त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  यामुळे आपण आपला एक चांगला कणखर पंतप्रधान गमवला त्यांचा विषयी थोडे अपमानास्पद चिड आणणारे वक्तव्य तक्तकालीन अमेरिकेच्या राष्टपतीने केले होते पण ते त्यास करावे लागले यातच सर्व काही आले असे मला वाटते आपणास काय  वाटते या विषयावर खुप काही लिहण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय बाय टेक केअर. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?