तंत्रज्ञानातील मराठी

                           सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग म्हणून ओळखले जाते. गेल्या 25एक वर्षातील तंत्रज्ञानाचा विस्तार ेथरारूनप करून सोडणारा आहे.  यात आपल्या माय मराठीचे स्थान कुठे आहे याचा विचार करता  दुर्देवाने फारशे उत्साहवर्धक चित्र नाही .मात्र गेल्या काही वर्षात यात सकारात्म्क बदल होत आहेत मात्र अन्य्‍  भाषेचा विचार करता ही गती अत्यंत कमी आहे . मराठीतील साहित्य्‍ संमेलनात याची दखल अत्यंत कमी प्रमानात घेतली जाते असे माझे प्रामानिक मत आहे. आज विज्ञान क्षेत्रात अनेक नवनविन शोध दिवसागणिक लागत आहेत मात्र त्याची माहिती सहजसोप्या मराठी भाषेत उपलब्ध्‍ होत नाही  इंग्लीश भाषेतील गोष्ट्र्‍ मराठीत आणताना त्यातील कंस्प्ेट ला मराठीत आणताना त्याला संस्क्रत  भाषेत शोभेल अशा शब्द सुचवला जातो आणि नको ती मराठी असे वाटण्यासारखी परीस्थीती निर्माण होते . .विकीपिडीयावर अनेक विषयावर सर्च केले असता मल्याळम कन्न्ड गूजराती आदी भाषेत प्रचंड माहिती मिळते याउलट स्थिती मराठीत आहे. सध्या मराठीत अनेक ब्लॉग आहेत मराठीत इंटरनेटवर आधारीत साहित्य्‍ संमेलन होत असले तरी ते पुरेशे नाही. तंत्रज्ञान आधारीत मराठीत अनेक बाबी अंतर्भत आहेत . त्यापैकी फारच थोडया बाबींचा यात

                        
   समावेश होतो. ऑनलाइन व्यवहारात मराठीचा वापर         अधिकाधीक होणे यात अंतर्भत आहे. एटीमचा वापर           मराठीत करणे ही याची पहिली पायरी आहे. आणि              मराठीचे तिथेच घोड पेंड खाते.अनेक बॅकांच्या एटीम    मध्ये मराठी भाषेचा पर्याय निवडल्यास प्रोग्रामच    लिहलेला आढळत नाही  त्याच प्रमाने मराठी         टायपिंगसाठी असणारे विविध फॉट हा सुध्दा एक    प्राब्लेम आहे. सध्या हा प्राब्लेम काही प्रमाणात कमी झाला आहे.त्याला कारणीभूत ठरला आहे यूनिकोड फॉट ज्यामध्ये आपण ज्याप्रमाणे मोबाइलमघ्ये एस एम एम टाइप करतो  म्हणजे मी टाइप केले जी ओ डी जी ओ डी बी ओ एल ए की टाइप होणार गोड गोड बोला या पध्दतीने 

                                 सध्या मराठीत तंत्रज्ञान विषयक लिखाण करणारे अत्यंत कमी आहेत. अच्यूत गोडबोले आंदीच्या अपवाद वगळता मराठीत मान्य्वर लेखक नाहीये. डॉ जयेत नारळीकर मोहन आपटे असे लेखक सध्या मराठीत निमार्ण होणे काळाची गरज आहे. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीनन संस्कृत  भाषेमध्ये असणारे ज्ञान  तत्कालीन मराठीत आणन्याचे काम केले आज पुन्हा: कोणीतरी ज्ञानेश्वर होण्याची गरज आहे . इंग्रजीत सायन्स्‍ विषयक अनेक मॅग्झीन्स्‍ आहेत .मराठीत स्वतंत्रय नागरीक साप्ताहीक सकाळ आदी साप्ताहीकांमध्ये काही प्रमाणात हा विषय अभ्यासला जातो. मात्र हा प्रयत्न्‍ अत्यंत तोकडा आहे. तो वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. 
               वाई येथील विश्वकोष महामंडळामार्फत तंत्रज्ञान आधारीत ज्ञान मराठीत आणण्याचे काम करत आहे मात्र तो अत्यंत तोकडा आहे. आपल्यापैकी किती जण त्यांनी तयार केलेला विश्वकोष वापरतात हा संशोधनाचा विषय ठरावा अशी त्याची स्थिती आहे .त्यामूळे मराठी ज्ञानभाषा होण्याचे अडथळे आपणास ज्ञात होतात. असो                

                           तर सांगायचा मुददा की मराठी जरी जंगातील 15 व्या क्रमांकांची बोलली जाणारी भाषा म्हणून जरी मराठी माहिती असली तरी ज्ञानभाषा म्हणून जीफारशी डेव्हल्प नाही याची खात्री पटते. भारतातील महत्त्वाची भाषा असूनही  मराठीची या क्षेत्रातील प्रगती या बाबतीजील प्रगती यथतथाच आहे .अमेरीकमत आयटी क्षेत्रात सर्वाधिक लोक मराठी भाषिक आहेत तरी मराठीची परिस्थिती अनकूल नाहीये या उलट स्थिती बंगाली आसामी या भाषेची आहे मघ्यंतरी कोल्हापूर येथून प्रसिध्द होणारे एक कॉम्पुटर संबधीत मासिक माझ्या वाचनात आल होते असे प्रयत्न्‍ वाढायला हवे तरच ही मराठी भाषा टिकेल अन्य भाषेत असे प्रयत्न्‍ मोठया प्रमानात सूरू आहेत. मराठी त्याबाबत कमी पडतीये असे माझे निरीक्ष्‍ाण आहे. मी या बाबत एकदा बोरवलीचे भाषा अभ्यासक शुभांगन गांगल यांच्याशी बोललो होतो त्यांनी मराठीचे व्याकरण सोपे करण्याविषयी भाष्य्‍ केले होते. त्यंचा मते मराठीतील एक वेलांटी आणि एक उकार कमी करायला हवा अर्थात हा वादाचा विषय ठरेल असो
मात्र तरी मूळ मूददा राहतोच जास्तीत जास्त ज्ञान मराठीत कसे काय आणायचे ?


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?