जाने क्यू ?

                  दिनांक ९ आणि १० जूनला ला मला माझे दोन जूने सध्या संपर्कात नसणारे मिञ भेटले
होते त्यातील एकाशी माझा एकाशी चांगली मैञी होती.  तर एकाशी सर्वसाधरण मैञी होती.  सर्वसाधरण मैञी असणाऱ्या  मिञाचा महाविदयालयीन अभ्यासात एक विषय कच्चा होता, तर दुसरा विषय माझा कच्चा होता.  एकमेकांचे कच्चे विषय माञ दुसऱ्याचे हुकुमी विषय होते . त्यामुळे अभ्यासात मदत करताना आमची मैञी झाली.  कांलातराने महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आमचे भेटणे कमी होत होत बंद झाले,  आणि  जवळपास  4वर्षांनी तो मला भेटला.  दुसऱ्याची मेञी माञ सहज अश्या कोणत्याही कारणाविना झाली होती,  हा मिञ माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून 5वर्षे झाले तरी  अजून चांगल्या संपर्कात आहे . जरी प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी व्हॉटसप फेसबुक, एस एम एस च्या माध्यमातून संपर्कात आहे तर हे दोन्ही मिञ मला अचानक भेटले.  दोन्ही वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो ज्या मिञासी अभ्यासातील काठिण्यामुळे मैञी झाली होती त्याच्याशी गप्पा फारशा रंगल्या नाहीत या उलट दुसऱ्या  मिञासी प्रचंड प्रमाणात गप्पा रंगल्या . 
                          तेव्हा पासून माझ्या मनात एक प्रश्न मनात रुंजी घालतोय,  तो अशा की महाविद्यलयीन जिवनात माझे दोघांशी सारख्याच प्रमाणात मैञी होती . (पुढे एकाशी घनिष्ठ संबध निर्माण झाले ही गोष्ट अलहीदा ,) त्यामुळे माझा मनात प्रश्न रुंजी घालु लागले की की घनिष्ठ मैञी होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते  जर दोन व्यक्ती एकमेकांचा जास्त काळासाठी एकञ आल्यास त्यांचात मैञीचे घनिष्ठ नाते तयार होते का ? आणि जर दोन मिञ जर खुप कालावधीसठी परस्परांपासून दुर गेले,  की त्यांचातील मैञीचे बंध सैलसर होतात का? की मैञीचे नाते तयार होण्यासाठी इतर गोष्टी आवश्यक असतात ? तुमचे या विषयीचे मत काय ?
                       एखाद्या कारणासाठी माणसे एकञ आली तर त्यास मैञी म्हणायचे का ? की मेञी ही सहज कोणताही हेतू मनात न धरता सहज होणारी क्रिया असते आपणास काय वाटते ? दोन व्यक्तीमध्ये मैञी कोणत्या कारणाने होते  किंवा होत नाही अथवा शञूत्व निर्माण होते याला काही विशेष कारणे असतात का ? की ही सहज घडणारी क्रिया असते मैञीमध्ये सूध्दा एखाद्याशी अधिक घनिष्ट संबध तयार होतात या उलट काही व्यक्ती केवळ मौजमस्तीसठी सोबत करणार्या व्यक्ति होतात याला काही विशेष कारण असते का ? की सहज घडणारी स्वाभाविक घटना असते मैञी विषयक अनेक चिञपट आले आहेत माझ्या मते त्या चिञपटात मैञीची रबड्डी ची चव दाखवली असते ती रबड्डी कशी तयार करतात ? त्यासाठी कोणते पदार्थ वापरतात ? याचा उल्लेख केलेला नसतो त्यामुळे मैञीविषयी बोलताना या चिञपटाचा फारशा उपयोग नाही असे माझे प्रामाणीक मत आहे तुमचे मत कदाचित माझ्यापेक्षा भिन्न असू शकते माञ माझ्यकडे तुमचे स्वागतच आहे असो                                    
                              मैञी कोणाशी करायची कोणाशी करायची नाही हे ठरवणे आपल्या हाती असते . रक्ताचा नात्यामध्ये आपले नाते कोणाशी करायचे याचा पर्याय नसतो,  त्यामुळे व्यक्तीचा आयुष्यात कोणते नाते महत्वाचे असते हाही प्रश्न महत्वाचा असतो.  रक्ताचा नात्यात निवडीला वाव नसल्याने ते सहजतेने स्किकारले जाते.  माञ मैञीचा नात्यात निवडीला वाव असल्याने हे सहजतेने स्विकारले जात नाही.  याचा मैञीवर परीणाम होतो का ? हा प्रश्न विचारला जावूस शकतोस तुमचे या बाबतीतिल मत काय ? माझ्यामते या गोष्टीचा नक्किच परीणाम होतोच तुमचे मत कदाचित या बाबतीत वेगळे असू शकते तरी माझ्याकडे तुमचे स्वागतच आहे या विषयी खुप बोलता येवू शकते माञ तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?