हिंदी मराठी दोघी भगिनी


                            माझा गेले काही दिवस काही हिंदी भाषिक व्यक्तीशी सात्यत्याने संपर्क येतोय .त्यावेळी मला हिंदी आणि मराठीत काही साम्य स्थळे आणि काही वेगळ्या बाजू प्रकर्षाने जाणवल्या . त्या सांगण्यासाठी आजचा पञप्रसंग
                                      हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा जर वरकरणी खुपश्या सारख्या वाटत असल्या तरी,  त्यात अनेक मूलभूत फरक आहे .   आपल्या मराठीतील "ज्ञ" या अक्षराचा हिंदीत उच्चार  " ग्य" अशा होतो .आपल्या मराठीत ज्ञ आणी ग्य ही दोन वेगळी अक्षरे समजली जातात . माञ हिंदीत ग्य आणी ज्ञ यांचे उच्चारण सारखेच आहे .  आपल्या मराठीत " ङ" हे अक्षर फारशे प्रचलीत नाही . माञ हिंदीत असे टिंब दिलेले अक्षर सर्वमान्य सहज गोष्ट आहे . मी जेव्हा हिंदीत काही लेखन केले तेव्हा माझ्या हिंदी भाषिक मिञांनी या मुद्याचा वापर करत चुका काढल्या असो . हिंदीत पुर्णविराम म्हणजे उभी रेष असते मी सवयीने टिब दिले असता त्यानी फुल स्टॉप नही दिया आपने ! अशी टिप्पणी दिली होती .
 .                        माझा त्या अनूभवावरून मी एक गोष्ट शिकलो ते म्हणजे हिंदी बोलण्यास सहज सोपी भाषा असली तरी, लिहण्यास तशी कठीण भाषा आहे . त्यातील मला जाणवलेली सर्वात कठीण बाब म्हणजे ते टिंब असणारे अक्षर . कोणत्याही अर्जात भाषेच्या अर्जात लिहणे वाचन आणि समजणे असे का लिहले असते ते मला या हिंदीमुळे समजले . शालेय स्तरावर मी ३ इयत्ता हिंदी शिकलो नंतर माझ्या हिंदीशी असणारा संपर्क संपला .असो .
                 
   मागे काही दिवसापूर्वी विश्व हिंदी संमेलन झाले , त्या अनुषंगाने एन डी टि व्ही इंडीया या वाहिनी वर बडी चर्चा या कार्यक्रमांतर्गत हिंदी भाषेचा सद्य स्थितीवर चर्चा चालू होती . चर्चेचा सुर हिंदी हिंदीत कथा कविता नाटक आदी साहित्य निर्मिती खुप मोठ्या प्रमाणावर होते . माञ विज्ञान विषयक साहित्याची निर्मिती कमी प्रमाणावर होते . परीणामी हिंदीचा अपेक्षीत विकास होत नाही , अशा होता . जे माझ्या मते( तुमचे मत यापेक्षा वेगळे असू शकते तूमच्या मताचे मी स्वागतच करतो )काही प्रमाणात मराठीचे पण दुखणे आहे . सर्व प्रादेशिक भाषा या संकटात तर नाहीना ? अशा प्रश्न ही यामुळे निर्माण होतोय  . 
        कुसुमाग्रजांच्या स्वातंञ्य देवतेची विनवणी या फटक्यात त्यांनी "भाषा मरता, संस्कृती  मरते"असे विधान केले आहे . त्यानुसार हा धोका आहे असे मला वाटते . तूमचे मत काय ?हिंदीचे व्याकरण काही कठीण नाही फक्त ते टिंब वाले अक्षरे ञासदायक आहेत असे मला वाटते तूम्हाला काय वाटते ?
                  तशी ही चर्चा ऐकल्यावर मला आनंद झाला चला मराठी काही एकटी नाहिये या बाबतीत तरी . हिंदी सोपी झाली पाहिजे . बोली भाषांचा वापर वाढायला पाहिजे असा ही मुद्दा यावेळी चर्चीला गेला . माझ्या मते हा मुद्दा विशेष महत्वाचा आहे तूम्हाला काय वाटते ? तसे यावर खुप काही बोलता येवू शकते . मात्र सध्यापुरते थांबतो  . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?