कधी जागे होणार ?

           काल शूक्रवारी नाशकात एका नाँन बँकिंग फायनांन्स  कंपनीत चोरीचा उद्देशाने बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या, ज्यामध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर माध्यमे नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर बोलू लागली . माझ्या मते हे सर्व देशभरातील चित्र आहे . आतापर्यत ते अदृश्य स्वरूपात होते . नाशिकमध्ये ते दृश्य स्वरूपात दिसले, हाच तो काय फरक.         

                    गेले कित्येक दिवस नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात मरणासंपन्न शांतता आहे . नाशिकच्या तरूणाईला हाताला काम नाईये . गोंदे येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने  बंद पडत आहेत . सातपूर येथील अनेक नामवंत  कंपन्या विविध कारणे दाखवत प्रक्षिणार्थी कामगाराना कामे देत नाहीये . त्यांना सुट्टी देत  आहे .  मात्र पापी पोटाला खायला तर लागतेच , त्या पोटाची खळगी भरण्यासाठी सरतेशेवटी तरुणाईला वाममार्गाचा अवलंब करावा लागतो , हे नक्कीच भुषणावह नाही .मुंबईतील टोळी युद्धाचा इतिहास जरी बघीतला तरी आपणास हे चटकन लक्षात येते की, मुंबईतील गिरण्या बंद झाल्या, आणि मुंबईतील गुन्हेगारी वाढली . रिकामे मन सैतानाचे घर असे आपल्याकडे म्हटले जातेच ना ? त्याचीच साक्ष पटवणारी ही उदाहरणे .
                तरुणाईच्या हाताला काम नसण्याला कोण कारणीभुत आहेत, याबाबत धांडोळा घेण्याचा  प्रयत्न केला असता ,सहजतेने लक्षात येते की हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे . मात्र या मुद्दयावर सरकारला घेरण्याऐवजी विरोधी पक्ष स्वतःच्याच नेर्तृत्वाचा गाळात फसलेला आहे . त्यामुळे या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष देण्यास विरोधी पक्षाला वेळच नाही .या उप्परही जर विरोधी पक्षाने यावर आवाज उठवायचा प्रयत्न केला तर सत्ताधिकारी पक्षातले वाचाळवीर त्यातील हवा काढण्यास टपलेले आहेच ना ? काहीतरी मुद्दा सोडून भलतेच विधान करायचे की, लागली सर्व माध्यमे त्यावर कथ्याकुट्ट करायला . जनतेच्या मुलभूत प्रश्नाला बगल त्यामुळे मिळते .
        
      त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वालीच उरलेला नसल्याने काल नाशिकमध्ये घडली तसी घटना घडते. अर्थात ही अलामिंग बेल समजून सरकारने वेळीच कार्यवाही करावी ,हे योग्य ठरेल . नाहीतर अश्या सारख्या घटना सातत्याने घडल्याने त्यातील गांभीर्य नष्ट होवून जनता हाती शस्त्र घेण्याचा धोका संभावतो . काही दिवसापुर्वी धुळे जिल्ह्यात एका खेड्यात काही अपराचित लोकांना मृत्यू होण्यापर्यंत मारहाण करण्यापर्यंत मारहाण  घटना घडली होती . ती याच भीतीच्या समजूतीतून . अश्या घटनांमध्ये यामुळे वाढ होवू शकते.


        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?