त्या वेळेस काय ?

               पुण्यामध्ये तरुणांसाठी  मनोरंजन करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत जसे  झेड ब्रीज  फर्ग्युसन  रोड कँम्प वगैरे माञ माझ्यासारखी अवलिया विचिञ  माणसे रविवार सायंकाळ घालवतात ती दांडेकर पुलावर हणजेच तेथील रामक्रूष्ण मठामध्ये रविवार सायंकाळी पाच ते साडेसात दरम्यान मुख्य मंदिराच्या खालच्या सभागृहात होणाऱ्या युथ फोरम या कार्यक्रमात (आता मनोरंजनाचे इतर चांगले पर्याय उपलब्ध असता ना तिथे जाणे हे अवलियाचेच लक्षण नाही का? )तिथे मठाचे स्वामी युथ वर्गास (मी जाणूनबुजून इंग्रजी शब्द वापरला आहे माझा पूर्वानुभवात एका यंग जनरेशनच्या मंचात तरुण हा शब्द असल्याने मूली तिथे येत नसल्याचे ऐकले होते म्हणून इंग्रजी शब्द ज्यात सर्व Gender includ )त्यांचा विविध समस्येबाबत मार्गदर्शन करत असतात त्यामध्ये आलेल्या अनुभवा विषयी मी बोलणार आहे
          एका कार्यक्रमात तेथील स्वामीजी म्हटले होते,की  देवाला प्रत्येकाची परीस्थीती माहीती असते आणि ईश्वर त्यानुसारच आपली जडणघडण करत असतो. उगीचच शॉटकटचा वापर करू नये आपल्याला आलेले अनुभव आपल्याला तयार करण्यासाठी विधात्याने केलेले नियोजन असते. आपला मुद्याचा विस्तार करताना ते म्हणाले की सुरवंटाचे फुलपाखरु होताना ज्यावेळेस कोश तोडण्याची वेळ येते त्या प्रसंगी त्या नवजात फुलपाखराची प्रचंड ओढाताण होते माञ या ओढाताणीतूनच त्याला पुढे आयुष्यात टिकण्यासाठी लागणारी ताकद त्याचा पंखात तयार होत असते .आपण जर अश्या वेळी त्यास मदत केली तर त्याचा पंखात पुरेसे न फडफडल्याने ताकद निर्माण न झाल्याने ते पुढे लवकर निधन पावू शकते.  स्वामींचे बोलून झाल्यावर होणार्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रमात उपस्थित झालेल्या एका  प्रश्नाला आज त्या कार्यक्रमाला सहा महीने झाले तरी मला समाधानकारक उत्तर सापडले नाही त्या प्रश्नाला त्या स्वामिंनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला माञ मी गळक्या माठाचे अर्थात कुंभ राशीचे  प्रतिनिधित्व करत असल्याने त्या गळक्या  माठातून ते सर्व वाहून गेले  व मी अजून अश्वथाम्यासारखा तहानलेलाच आहे. त्या उत्तरा बाबत.  
                         तर प्रश्न होता लेकिन वो चल रहा होता है उस समय क्या ? जेव्हा ही मनाची डोलायमन अवस्था असते त्या वेळेस आपले ईतर स्नेही स्पर्धक पुढे जातात आपण माञ झालेल्या चूका चिडवत बसतो गुणवत्ता असून ही मागे पडतो याचे कारण तर काय ईश्वराला आपल्यास सदर अनुभव देयचा होता काय म्हणावे अश्या वेळी  त्यास पाशाषह्रुदयी इश्वराला ? तुम्हाला काय वाटते मी माझ्या एका मिञाला या विषयी बोलले असता त्याने दासबोधात याचे उत्तर असल्याचे सांगितले या विषयी आपले मत मांडल्यास मला आनंदच होइल गिता असेल किंवा बौध्द धर्माचा तत्वज्ञानावर आधारलेला मिलिंद पन्ह हा ग्रंथ असेल हे ग्रंथ प्रश्न उत्तर स्वरुपातच आहे ना त्याची कलीयुगाची आर्वुत्ती या मुळे तयार होइल कदाचित या विषयी खुप काही बोलता येइल पण सध्या थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?