हेतू योग्य , कृती अयोग्य

                      सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक वातावरण विविध वादांनी गाजतंय , ज्यात इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमाचा विषय प्रमुख आहे . अभ्यासक्रमात गणित विषयातील क्लिष्टता दुर व्हावी या उद्देशाने संख्या शिकवण्याची पद्धत याचा मुळाशी आहे . या बाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास , हेतू चांगला प्रामाणिक आहे, त्याबद्दल शंका घेण्यास वावच नाहीत, मात्र हे राबवण्याची पद्धत पुर्णतः.अयोग्य आहे
                 शिक्षणाद्वारे  कमकुवत व्यक्तींचा क्षमता वाढवणे अपेक्षीत असताना, अस्तिवात असलेल्या क्षमतेला अनुसरुन अभ्यासक्रम राबवल्यास क्षमता अजून खालावेल मग त्या वेळेस दर्जा अजून खालवणार का ? हा प्रश्न आहे . क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय यावर आहे.
                  आणि अश्या पध्द्तीने शिकलेले लोक आयष्यातील अडीअडचणींना तोंड देण्यास सक्षम होतील का ? मी एका ठिकाणी व्याख्यान ऐकलेले होते , त्यात त्यांनी सांगितले होते . आयुष्यातील अडचणींना घाबरायचे  नसते तर त्यानं सामोरे जायचे असते . या छोट्या बाबींवर सोपा मार्ग शोधणारी ही पिढी अश्या संकटाना कितपत सामोरे जाऊ शकेल ?
                       हा प्रश्न का निर्माण झाला , याचा विचार करता आपणास लक्षात येते की, तणावविरहीत शिक्षण करण्याचा प्रयत्नात शिक्षणाचा मुलभुत हेतूच दुरावतोय. जरी मानसशात्राचा विचार केला असता तरी त्यात व्यक्तीला काही प्रमाणात ताण असावाच असेच सांगितले आहे . पूर्णतः ताणविरहित आयुष्य असल्यास माणसे काहीच करणार नाहीत असे मानसशात्र सांगते . स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा सांगितलंय की  तुंहाला ताण आहेत अडचणी आहेत, म्हणजे तुमचे आयुष्य बरोबर चालू आहे , ज्या दिवशी तुम्हाला ताण अडचणी नसतील त्या दिवशी तुमचे आयुष्य चुकीच्या मार्गावर आहे असे समजावे . हा स्वामीजींचा विचार लक्षात घेतला तर आपण चुकीचे तर करत नाहीना असे म्हणण्यास वाव  आहे .
                यावर तोडगा  काढायचा झाल्यास माझ्या मते  गणितविषयक अध्ययन अक्षमता असणाऱ्या व्यक्तींना अमीर खानच्या तारे जमीन पार या चित्रपटात दाखवलेल्या प्रमाणे शिकवावे, त्यांच्यावर अधिक लक्ष द्यावे मात्र सध्या त्यास्तही वापरण्यात येणारे पध्द्त त्यासाठी संपूर्णतः अयोग्य आहे असे माझे पूर्ण मत आहे
यावर सर्वंकष मंथन होणे आवश्यक आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?