वाचनाचे नवे स्वरूप

         आपल्याकडे "वाचाल तर वाचाल " अशी एक म्हण प्रचलित आहे . जर वाचन केले तर प्रगती होतोय
लोकांत मन मिळतो , मनुष्य बहुश्रुत होतो , अशा या म्हणीचा अर्थ . आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक महान व्यक्तिमत्व या वाचनामुळे घडली . समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा वाचनाचे महत्व आपल्या रचनेनेतून संगीतातले आहेच . ते म्हणतात "दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसांगी अखंडित वंचित जावे,  शहाणे करून सोडावे सकल  जण''  .
        या वाचनाचे अनेक पर्याय सध्या आपणांकडे आलेली आहेत . पारंपरिक छापील पुस्तकांबरोबरच अत्याधुनिक अश्यां इ बुक सारख्या पुस्तकांमुळे  पुस्तकांचे विश्व अधिकच रुंदावले आहे . किंबहुना यामध्ये रोजच भर पडत आहे . आधुनिक साधनांमुळे कमी जागेत कमी खर्चात जास्त संख्येनं पुस्तके साठवली जात असलयाने पुस्तकांचे हे जग रुंदावत आहे . काही जण आधुनिक साधनांमुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड करतात ,.मला हे मान्य नाही . माझ्या मते अशी ओरड करणारे निव्वळ छापील  पुस्तकांचा विश्वात रममाण होणारे असतात . वाचनाच्या  नव्या स्वरूपाला हे वाचन मानतच नाहीत , आणि त्यामुळेच हे वाचन
संस्कृती धोक्यात असण्याची यची वदंता करतात . किंडल किंवा आता  मी तुमच्यासी ज्या माध्यमाच्या मदतीने संवाद साधत आहे ते ब्लॉग हे माध्यम ही वाचनाचे आधुनिक स्वरुप आहे . आज अनेक मराठी पुस्तके बुकगंगा आदी माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध आहेत . किंवा ज्यांचा कॉपीराईट संपला आहे  त्यांची  पीडीएफ तयार करून विविध समाज माध्यमातून त्या अनेकदा वितरित केल्या जातात . आजमितीस माझ्याकडे अश्या जवळपास ४० पुस्तकांचा खजिना आहे . म्हणजेच निव्वळ वाचनालये ओस पडली म्हणजे . वाचन संस्कृती संपली असे मानणे चुकीचे आहे . सध्या वाचन संस्कृतीने आपला पारंपरिक ढाचा बदलून नवा ढाचा तयार केला आहे . असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे .
 किंबहुना जो पर्यंत मानवाला ज्ञान लालसा आहे , तो पर्यंत वाचन संस्कृती लयास जाणे कदापि शक्य नाही .
              त्यामुळे "वाचन संस्कृती धोक्यात  आहे " या वाक्याला काहीच अर्थ नाही .  सध्या एक संस्था ऑनलाईन साहित्य संमेलन घेतच आहे ना ? त्याचीच पुढे चालती आहे .
सध्याची तरुण पिढी नव्या साधनाचा वापर करत आहे  आणि करत राहिल , या बाबाबत शंका नसावी . आताचे जग ऑनलाईन लायब्ररीचे आहे . नक्की पारंपरिक  पुस्तकाचा वाचनालयाचे . याबाबत जी भाषा बाजी मारेल , तिचेच वाचन अधिक होणार दुर्दैवाने आपली मराठी अन्य भाषेच्या अतुलनेत काहीशी मागे आहे . ती या बाबतीत पुढे येणे अत्यावश्यक आहे .
       

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?