संगीत दिनाच्या निमित्याने

             वर्षातील काही दिवस विलक्षण हटके असतात . एकाच दिवशी दोन किंवा तीन महत्तवाचा घटना त्या दिवशी घडलेल्या असतात, अथवा आपल्या आयुष्यावर प्रचंड परीणाम करणाऱ्या दोन अथवा तीन बांबीविषयक दिन त्या दिवशी साजरा करण्यात येतो. वर्षातील 172 वा अथवा लिप वर्षातील 173 व्या दिवशी उगवणारा 21 जून असाच एक हटके दिन . या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो.  आपण सर्वांनी वृत्तपत्रात वाचले आहे वाहिन्यांवर बघीतले आहे तो म्हणजे  आंतरराष्ट्रीय योग दिन . मात्र मी बोलणार आहे , मराठी वृत्तपत्रात फारसा चर्चीला न गेलेला दिन , अर्थात आंतरराष्ट्रीय संगीत दिन
        संगीताचे मानवी आयुष्यातील स्थान अनन्य साधारण आहे . निव्वळ मनोरंजनासाठीच नव्हे तर ,


सध्याचा आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा अनेक दुर्धर  व्याधींचे निदान होण्या बरोबर त्यांच्यावर उपचार होण्यासाठी सांगीताचा केला जातो . त्याचप्रमांणे आंतरराष्ट्रीय राजकारणात  शांततेचे प्रतीक म्हणून देखील संगीताचा वापर होतो . तर या संगीता  प्रित्यर्थ  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  योजलेला दिवस  म्हणजे आंतरराष्ट्रीय संगीत दिन जो 21 जून रोजी साजरा करण्यात येतो . 
                        या दिनाची सुरवात फ्रांस मध्ये 1982 मध्ये  झाली . तत्त्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी लोकांना एकत्र येण्यासाठी एक कार्यक्र्म घेण्याचे ठरले तोच हा आंतरराष्ट्रीय संगीत दिन. २०००साली अमेरिकेत हा दिवस साजरा केल्यापासून  हा दिवस व्यापक  प्रमाणावर साजरा करण्यात  येऊ लागला . आजमितीस १२० देशातील ७०० शहरांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो . संगीताला  फक्त मानवी मनाची भावानंच समजते , हा संदेश यातून दिला जातो . या दिनाच्या सर्व संगीत प्रेमींना आणि कर्णमधुर संगीताची निर्मिती करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेछा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?