शिक्षणातील महत्वाचा दुवा शिक्षक

           शिक्षणात अत्यंत महत्वाचा घटक असणारा शिक्षकाविषयी फारच कमी बोलले जाते आज याविषयी
बोलणार आहे  आपल्या  भारतात शिक्षकांना कागदोपत्री अत्यंत मानाचे स्थान  आहे . त्यांना राष्टपती पुरस्कार देण्यात येतो . भारतीय संस्कृतीत त्यांचाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका सणाची तरतूद करण्यात आली आहे . मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी प्रत्यक्ष जोडले गेलेल्या शिक्षकांचाविषयी फार कमी बोलले जाते . विद्यार्थ्यांचा आनंदमय शिक्षणात त्यांचा देखील महत्वाचा  सहभाग असतो . मात्र आपल्याकडून त्यांचा समस्या जाणून घेउया .
              चांगल्या शिक्षणासाठी त्याना अशैक्षणिक कामे देऊ नये असे बोलले जाते मात्र सध्याचा शिक्षणाच्या विविध प्रयोगाच्या काळात त्यांना प्रचंड प्रमाणात शैक्षणिक कामे करावे लागतात उदा प्रत्येक आठवड्यात चाचणी घेणे ते PAPER तापासणे त्यांना मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रुपांतर करणे त्या श्रेण्य्या प्रगती पुस्तकात भरणे  इत्यादी अनेक कामे त्यांना शैक्षणिक म्हणून करावी लागतात . त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांची ओळख ह्यावी या उद्देश्याने विविध जयंती आणि पुण्यतिथी शाळेत साजऱ्या केल्या जातात . त्याची तयारी करणे हे वेगळेच काम असते . शिक्षकांचे कामाचे तास हे प्रत्यक्ष अध्यापनाचे धरायचे की त्यासाठी लागणाऱ्या तयारीसाठी खर्च पडणाऱ्या तासांना देखील त्यात अंतर्भूत करायचे हा मुद्दा काही काळ बाजूला ठेवूया . 
       
   महाविद्यालयीन पातळीचा विचार करता NSS सारख्या उपकरणाचे ओझे असते (त्याचा फायदा किती व कोणाला होतो त्यांचे विद्यार्थीच्या व्यक्तीमत्त्व  सुधारण्यातील योगदान हा वेगळा विषय ठरेल म्हणून तो विषय बाजूला ठेऊ क्षणभर ) या कामंचा त्याचं शिकवण्यावर परिणाम होतोच
                मी पुण्यात असताना मला अनेक BED करणारे विद्यार्थी भेटायचे ते म्हणत अजिंक्य STUDENT फारच त्रास देतात मागून खडू मारतात आणि सरकारी निर्यायामुळे त्यांना शिक्षा पण करता येत नाही भविष्यात विद्यार्थांचा त्रासाला कंटाळून शिक्षाकानी आत्महत्या केल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांना होणारा त्रास त्यांचा नवखेपानाने गांगारून जात असेल कदाचित मात्र विद्यार्थांच्या  वात्यापानामुळे शिक्षकांना शिकवताना ना होणारा त्रास माध्याव्दारे फारसा चर्चिला जात नाही

टिप्पण्या

SUNIL DESHPANDE म्हणाले…
विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना होणारा त्रास ही खरंच डोकेदुखी आहे आणि त्यावर कसे नियंत्रण करायचे हा पूर्ण समाजाच्या पुढेच मोठा प्रश्न आहे. शिक्षकांनी करणारी शिक्षा बंद झाल्याने विद्यार्थ्यांवर कोणताही धाक राहिलेला नाही आणि विद्यार्थीच उलटपक्षी शिक्षकांना शिक्षा करू लागले आहेत असे दिसते. या प्रश्नावर समाजात व्यापक चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे.
परंतु आपण शिक्षकांना दिलेली जी शिक्षकेतर कामे म्हणून उल्लेख केला आहे ही कामे शिक्षणेतर नसून विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकाने करणे आवश्यक आहे असे वाटते. इतर सरकारी कामे उदाहरणार्थ निवडणुका किंवा स्टॅटिस्टिकल माहिती सरकारला पुरवणे वगैरे वगैरे अशासारखी शिक्षणेतर कामे बंद झाली पाहिजेत, आणि शिक्षकांना मिळणारा जास्तीत जास्त वेळ शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी वाचन मनन चिंतन यामध्ये राहून व्यतीत केला पाहिजे हे मात्र नक्की.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?