मला भावलेला श्रीमंत दासबोध

                          गेल्या काही दिवसांपासून मी ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचत आहे.   या दोन्ही ग्रंथांचा गोडवा अवर्णीयच वेगळाच आहे .  त्यातही दासबोधचा गोडवा मला तरी काही औरच आहे असे वाटते .  प्रामुख्याने
त्याची  केलेली रचना ही गोष्टच .   त्याचे वेगळेपण दर्शवते,  10 समासांचा एक दशक असे 20 दशक प्रत्येक समासात अत्यंत सोप्या भाषेत समाजात वावरताना व्यक्तीची वर्तणूक कशी असावी अथवा असू नये याचे वर्णन म्हणजे दासबोध, असे दासबोधाबाबत सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास म्हणता येईल .
               ज्ञानेश्वरीची भाषा जरी मराठी म्हटली तरी  काहिशी अवघड वाटते, याउलट गोष्ट  दासबोधाची आहे.  अत्यंत सोपी भाषा हे मला भावलेले दासबोधाचे आणखी एक वैशिष्ट सध्याच्या काळात सॉफ्ट स्किलला (मराठी शब्द सुचवल्यास मला आनंदच होइल ) प्रचंड महत्व आलेले आहे ते शिकण्यासाठी लोक प्रचंड प्रमाणात पैसाही खर्च करतात.  अश्या लोकाना मला सांगणे आहे त्यांनी प्रथम दासबोध वाचावा, आणि सुदैवाने आता त्याचे अँपही आले आहे.  (मी अँप वरुनच हे दौन्ही ग्रंथ वाचत आहे ) आणि  मँकडौनाल्ड सारखी दुकाने अर्धातास फ्री वायफाय देतात त्याचा वापर ईतर संकेतस्थळे बघण्याऐवजी हे अँप डाउनलोड करायला वापरल्यास सोन्याहुन पिवळेच ना असो . 
           
                      माझ्या आयुष्यात झालेला  हा दासबोधाचा प्रवेश जर याचा आधी झाला असता तर सध्या जिथे मी आहे त्यापेक्षा मी अधिक उंचीवर असतो,  हे माञ नक्की.  माञ दुर्घटनासे देर भरी या न्यायाने आता झाला हेही नसे थोडके समय से पहीले किशी को कुछ नही मिलता असे म्हणतात ,माझा हा समय असेल  कदाचित ,दासबोधाला भेटण्याचा  असो .
                     ज्ञानेश्वरी विषयी बोलायचे झाल्यास,  सातशे वर्षापुर्वी समाजातील एका फार मोठ्या घटकाला वर्ज असणारे ज्ञान समाजाला देण्याचा त्याचा उपक्रम खरोखरीच स्तुत्य आहे.  ज्ञानेश्वरी त्या वेळच्या बोली भाषेत लिहली गेली आहेत त्यानंतर साधरण तीनशे वर्षांनी लिहल्या गेलेल्या दासबोधाच्या बाबतीत सूध्दा आपण तेच म्हणू शकतो.  दासबोधाची रचना होउन सध्या  साधरण साडे तीनशे वर्षे झाली आहेत जर भाषेचा द्रुष्टीने आपण या गोष्टीचा अभ्यास केल्यास मराठी भाषेचा विकास कशा झाला हे आपणास कळते .
संत रामदास स्वामी यांचा आयुष्यातील सुरवातीचा काही काळ नाशिकच्या टाकळी  येथे गेला त्या परीसराला मी अनेकदा भेट दिली आहे प्रत्येक वेळेस मला छान वाटले आहे असो .
           मनाचे श्वोकही आयुष्यात खुप काही शिकवून जातात ते संख्येने जरी 205 असले तरी 2050 पानात सुध्दा जे सांगणे एखाद्याला कठीण होइल अश्या गोष्टी त्यांनी या 4 ओळीच्या श्लोकातून सांगीतले आहे.  मन स्थिर नसले की काय होते हे आपण पुण्याचा संतोष माने या प्रकरणात बघीतले आहेच.   तर या मनाला नियंञणात कशे आणि  का ठेवावे याचे  सोप्या भाषेत विवेचन यातुन मिळते या विषयी खुप काही बोलण्यासारखे आहे पण तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तोसपर्यत राम राम
जय जय रघूवीर समर्थ
      व्यवहारज्ञानाची गोष्ट क्षणभर बाजूला ठेवली तरी एखाद्या गोष्टीचे नियोजन कशे करावे ?  याचा अभ्यासाठी तरी दासबोध हाताळायलाच हवा असे माझे प्रामाणीक मत आहे .  समास आणि  दशकाचा माध्यमातून केलेली श्लोकांची रचना हे माझ्या मते तरी सुसुञ बांधणीचे उत्कुष्ट उदाहरण आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?