कोण बघत कशासाठी चिञपट

             " कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा 24 जूनला माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला 
  तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते
             फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक (Infotentment ) महत्वावाची ? चिञपट हे साधन माझ्यामते तरी ज्ञानवर्धक करमणूकीसाठी वापरले गेले पाहीजे दूर्दैवाने मधूर भांडारकर अमिर खान सारखे अपवाद सोडले तर भारतात सर्वाधिक लोकांची मातृभाषा  हिंदीत त्या प्रकारचे चिञपट तयार करणारे माझ्या माहितीत तरी कोणी नाही (अपवाद पा आणि माय नेम ईज खानचा  चा )               
                  
मराठीत माञ तूलनेने असे चिञपट निर्माते खुप आहेत दहावी फ ,कोर्ट , नागरीक , देवराई , दोघी , देउळ स्वामी ,नितळ तुरुंग देश ,कायद्याचे बोला  ,गोष्ट  डोगराएव्हढी  ही यादी अजून प्रचंड प्रमाणात वाढवता येउ शकते तर सांगायचा मुद्दा की  आपल्याला असणारे ताणाचे ओझे घेत फक्त  निव्वळ करमणूकीला प्राध्यान देणारे चिञपट बघायचे की आपल्या ताणाबरोबर दुसरऱ्याचाही दुखाची जाणीव करुन घेत त्याचा दुखाचा अप्रत्यक्ष अनुभव घेत करमणुक करून घेणे अधिक श्रेयस्कर नाही का ?
                   विंदा करंदीकर यांनी सुध्दा  घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेता घेता  देणाऱ्याचे हातही घ्यावे असे म्हटले होते मी त्याचाच विस्तार करत जर घेयचेच असेल तर दुसऱ्याचे दुःख का घेउ नये आणि घेउन त्याचे तिमिर का दूर करायचा प्रयत्न का करु नये. आणि आपल्या संत परंपरेतील सर्वोच्च स्थानी असलेल्या संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात  दुष्ट लोकांचे पण दुख  जावे (दुरितांचे तिमिर जावो )अशी प्रार्थना केली आहे ना ?
      मग आपण किमानपक्षी दुसऱ्याचे दुख जाणून घेण्यात काही गैर नाही ना ? आणि जगात दुख प्रत्येकाला आहेच नाहीतर आपल्या संत वाङमयात जगी सर्व सुखी असा कोण आहे रे ? विचारे मना तुच सोधूनी पाहे असे वचन तरी का आले असते तेव्हा कशला आपल्याला दुख असताना दुखी चिञपट बघायचे हा मुद्दा चुकीचा असल्याचे माझे मत आहे तुमचे मत काय ?    
     
    
      जर आपण ज्ञानवर्धक चिञपट जास्त बघीतले तर  बाजारपेठेचा कल ज्ञानवर्धक चिञपट बघण्याकडे आहे तेव्हा असेच चिञपट निर्माण होतील याउलट परीस्थीती आपल निव्वळ करमणूक प्रधान चिञपट बघीतलेस निर्माण होइल यावर खुप काही सांगता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?