समाज माध्यमे


       समाज माध्यमे अत्यंत उपयोगी साधन आहे. आजकाल समाज माध्यामांविषयी नकारात्म्क
जास्त्‍ ऐकायला मिळतयं विशेषत: पब्जी  या खेळामूळे त्या बाबत नकारात्म्क चित्र उभे केले आहे मात्र हे चित्र पुर्णपणे खरे नाही या समाज माध्यामांव्दारे रोजगार निर्मीतीच्या देखील संधी निर्माण आहेत हे ऐकून तूम्हाला कदाचित खोटे वाटेल मात्र हे खरे आहे. जर तूमच्या ब्लॉगला बहूसंख्य भेट देणारे असतील तर तुमच्या ब्लॉगवर गूगल जाहिराती देउ शकते त्याव्दारे तूम्ही चांगली अर्थप्राप्ती करू शकतात .
    लिंकडन या समाज माघ्यामाव्दारे आपण आपले व्यावसाईक नातेसंबध अधीक दृढ करू शकतो .
आपल्यापैंकी अनेक जणांना सन 2013 च्या सूमारास  झालेली भारतातील क्रांती आठवत असेलच अन्ना हजारेंच्या क्रांतीच्या व्यापक प्रसारा मागे समाज माध्यामांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे निव्व्ळ भारतातच नव्हे तर उत्तर  आफ्रिकी देशांमध्ये सूध्दा याच कारणातून यादवी सद्रश्य परिस्थीती निर्माण झाली होती हे पण आपण लक्षात घ्यायला हवे
   प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे पण असतात तीच बाब या गोष्टीला पण लागू होते . समाजमाध्यमे दुधारी शस्त्र आहे. जे  सूयोग्य पध्दतीने वापरल्यास अत्यंत उपयोगी आहे. मात्र उलटल्यास जीवनायची माती देखील करू शकते . दुर्देवाने त्याची नकारात्म्क बाजूच सातत्याने समोर आणली जातेयं. याचे धोके मोठे आहेत हे मानले तरी याचे फायदे देखील आहेत.
         समाज माध्यमामूळे ज्यांना पारंपारीक माध्यामातून आपली मते मांडता येत नाहेी त्यांना व्यासपीठ मिळाले. लोक कोणत्याही अडीअडीचणीशिवाय आपली मते मांडायला लागली . लोकांचा आवाज मोठा झाला .हे दुर्लक्षून चालणार नाही.
   
     समाजमाध्यमांव्दारे ‍निव्व्ळ मनोरंजनच होते असे नव्हे तर ज्ञानसुघ्दा ‍मिळते . यूटयूबव्दारे आपण स्व्त:चा स्व्त: अभ्यास करू शकतो. युटयूबवर अन ॲकेदमी खान ॲकेदमी असे अनेक युटयूब चॅनेल आहेत ज्या व्दारे आपण विविध विषयावर ज्ञान मिळवू शकतो. 2014 साली भारतीय जनता पार्टीने याच माध्यमाचा वापर करत सत्ता  स्थापन केली होती हे विसरून चालणार नाही. फेसबूकवर अनेक चांगले ग्रूप आहेत .फेसबुकवर डि वाय पाटील  नावाचे एक माहितीपर पेज आहे. त्याचप्रमाने व्हाटसपच्या माध्यमातून एकत्र येत अनेक समाजउपयोगी कामे करणारे ग्रुप व्हाटसपवर आहेत. आपल्या आवडत्या विषयाशी संबधीत ग्रुपमध्ये सहभागी होउन अनेक जण आनंद उपोभगोत आहेत
       Twitter या माघ्यमाव्दारे आपणास विविध लोकांची एखादया विषयावरची मते चटकन समजतात तसेच बातम्या देखील समजतात ते देखील अत्यंत  कमी शब्दात . जर आपण्‍ स्वत्: twitter लिहायला सूरवात केली तर कमी शब्दात जास्तीत जास्त्‍ माहिती कशी द्यायची याचे प्रशिक्षण मिळते. त्यामूळे twitter चा उपयोग करणे सद्य स्थितीत अत्यंत उपयोगी ठरते.
     समाज माध्यामाचा वापर करतान वेळ वाया जातो अशा आक्षेप सातत्याने यावर घेतला जातो. मात्र मोबाईल मधील डेटा कंटऱ्ोल प्रणाली वापरल्यास यावर सहज नियंत्रण ठेवता येते. त्यामूळे वेळ वाया जातो याला तसा काही अर्थ नाही.
आपल्या मनाची गरज कौतूकाची गरज असते .ती समाज माध्यमांव्दारे पुर्ण केली जाते.
         युटयूबवर अनेक विषयावर व्हिडीओ आहेत. ज्यांना अभ्यास करताना सतत वाचण्याचा कंटाळा येतो त्यांना या युटयूब व्हिडीओचा खुप फायदा होतो. विशेषत: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना याचा खूप फायदा होतो. ज्यांना सतत अभ्यास करावा लागतो .
            समाज माध्यमांव्दारे अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचणे सहजशक्य्‍ असल्याने आपल्या व्यवहाराची जाहिरात करण्यासाठी समाज माघ्यमे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात . आपण युटयूब व्हिडीओ ब्लॉग किंवा फेसबूकवर सहजतेने जाहिरात देउ शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?