व्यथा त्यांचा

                            सध्या शिक्षणात खूप सारे बदल होत आहे मात्र या सर्व प्रयानात एक घटक काहीसा दुरावलेला दिसतो तो म्हणजे शिक्षण अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुला मुलींचा .नाही म्हणायला यातील काही
घटकांची गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झालेली आहे जसे स्वमंगता (ऑटिझम ),वगैरे मात्र या समस्या १८ पेक्षा जास्त असून त्यातील फारच थोड्या यात चर्चील्या गेल्या आहे
  शाररीक कारणामुळे येणारी अध्यय अक्षमता जसे मूक बधीरपणा,    अस्थिव्यंग या मुळे होणारी अक्षमता समाजाचा लगेच लक्षात येते मात्र मानसिक अनारोग्यामुळे येणारी अक्षमता ज्याचा वाटेला येते त्याचां वाटेला फारच त्रास येतो ते काम टाळण्यासाठी हे नाटके करत आहेत असे त्याचाविषयी बोलले जाते शाररीक व्यंग ज्या प्रमाणे सहज दिसते त्या प्रमाने मानसिक व्यग दिसत नसल्याने व समाजात त्याविषयी फारच अज्ञान असल्याने त्याची फारच परवड होते
त्याचे प्रकार पुढील प्रमाणे व थोडक्यात माहिती
                1 )विशिष्ट वाचा दोष -भाषा उच्चारणात दोष बोलण्यात दोष विशिष्ट अक्षरे मुळाक्षरे बोलता न येणे श्वास नियंत्रणामुळे येणारे दोष . योग्य वाचा प्रक्षिक्षण दिल्यामुळे या दोषाचा मर्यादा कमी करता येतात
                 2 )विशिष्ट लेखन दोष - लेखनाचा संकल्पना स्पष्ट नसतात शब्द अक्षरे लिहिण्यात चुका मिरर इमेज दोष ३ असेल तर अशी व्यक्ती ६ लिहतात शब्दामधील अक्षराचा क्रम उलटा लिहिणे उदाहरणार्थ कमल शब्दाऐवजी लमक लिहिणे पुस्तक या शब्दाऐवजी कुस्तप असे लिहिणे -वाक्यरचना लिहितांना योग्य प्रकारे समास व अन्तरे सोडू न शकणे सर्व अक्षरे सारखे न काढणे . शब्दात असणाऱ्या अक्षराविषयी संकल्पना स्पष्ट नसतात . उदाहरणार्थ अनुस्वार कोठे द्यावा , जी अक्षरे लिहतात ती चुकतात ,सलग लिखाण करणे जमत नाही . अतिशय गबाळे ,आपल्या वस्तू (पेन पेन्सिल ) सारख्या हरवणारे ,अतिचंचल असतात एका ठिकाणी बसून लिखाण करणे ,अवधान केंद्रित करणे जमत नाही .
                   ३)विशिष्ट वाचन दोष -भाषा वाचताना अडथळे ,चमचा शब्द जमचा वाचतील शब्दातील अक्षरे उलटी करून वाचणे ,शब्दातील अक्षरे गळून वाचणे . शब्द वाचताना नसलेल्या मुळा क्षाराची भर घालून वाचणे

आणि शब्द वाचताना एखाद्या मुळाक्षराऐवजि दुसरे मुळाक्षर वाचणे उदाहरणाणर्थ कमल या शब्दाऐवजी उमळ वाचणे इत्यादी सलग भाषा वाचताना पहिल्या ओळीतील मजकूर पूर्ण वाचण्याऐवजी दुसऱ्या ओळीवर जाईल अवधान केंद्रित न झाल्यामुळे सलग मजकूर वाचणे जमत नाही .उलटी प्रतिमा वाचणे ,ओळीवर बोट ठेऊन वाचणे मत नाही
               4 )विशिष्ट वाचन लेखन दोष - यात लेखन वाचन विषयक दोन्हीही दोष असतात
                  5 )विशिष्ट अंक गणित दोष - अंकाची संकल्पना -किंमत स्पष्ट नसणे . गणिताच्या मुलभुत प्रकिया या विषयी संकल्पना विकसित नसणे हातच्याची बेरीज व वजाबाकीचा संकल्पना स्पष्ट नसणे विशिष्ट्ब क्रम त्यांचा लक्ष्यात रहात नाही बेरीज, वजाबाकी ,गुणाकाराचा व भागाकाराचा संख्यांची किंमत ते मिरर इमेज मुळे सारखीच वाचतात उदाहरणार्थ 3६ हि संखा ६ 3 वाचतात . सर्व मुलांमध्ये अवधान केंद्रित रहात नाही
                या मध्ये आधीच सांगितल्या प्रमाणे त्यांचे १८ उप प्रकार पडतात मात्र विस्तार भयास्तव सध्या येथेचथांबतो bye take care आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?