28 वर्षानंतर

दिनांक 24 जूलै 1991 साली आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने तिच्याकडील सोने विमानात भरून जागतीक बँकेकडुन जमा करून अर्थव्यवस्था सुधारण्याससाठी कर्ज घेतले होते . आज 28 वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था या धक्यातून पुर्णपणे सावरलीच नसून सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन बनू पहात आहे . ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे . त्याकाळी  त्यावेळची कोणतीही आर्थिक  ताकद आपणास कर्ज देण्यास तयार नव्हती आपल्या भारताकडे जेमतेम दोन तीन दिवस पुरेल इतकीच परदेशी गंजाजळी होती या परिस्थितीवर मात केली ती नंतर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर  आणि  नंतर सलग  दोनदा पंतप्रधान झालेल्या आणि  देशात सुधारणेचे युग आणणाऱ्या  राजीव गांधी यांनी ज्यांना परदेशातून अक्षरशः उचलून आणले त्या मनमोहनसिंग यांनी . त्यांनी नरसिंह राव (बोलो तो लूक इस्ट पॉलीसीचे जनक )यांचा नेतृत्वाखाली  राबवलेल्या खाजगीकरण उदारीकरण जागतीकीकरण या तत्वाचा स्विकार केल्याने भारतीय अर्थव्यवस्था आजचा टप्पा गाठू शकली .
 . प्रचंड प्रमाणात वाढलेला सरकारी खर्च माञ त्या प्रमाणात उत्पादन नसणे , अगदी मिठापासून ब्रेड पर्यत  सर्वच क्षेञात असलेला सरकारी वावर .खाजगी उद्योजकांना नकोशा वाटतील ईतक्या जाचक अटी असे चिञ त्यावेळी होते .याच अटीतून बाहेर पडण्यासाठी  मग जे विविध उपाय त्यावेळचा उद्योजकाकडुन स्विकारण्यात आले त्याची परीणीती म्हणजे स्वीस बँकेतील पैसा होय . जो आज आपल्या अर्थव्यवस्थेपुढील असणाऱ्या  आव्हानापैकी एक आहे . आज आपली अर्थव्यवस्था जीडीपीचा विचार करता  करता जगात पाचव्या  क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे . 
          आज जगातील पहील्या दहा क्रमांकाच्या आपल्या  परकीय गंजागळीचा साठा आपल्याकडे  आहे . भावी अर्थव्यवस्थेत महत्वाची भुमिका पार पाडु शकणारा देश म्हणून जग आज आपल्याकडे बघत आहे. नरेंद्र मोदी ज्या डेमोग्राफीक डिव्हीडंदचा वारवार उल्लेख करतात त्याची पायाभरणी या धक्कयातून सावरण्यासाठी येजलेला उपाय योजनेची फलनिष्पीती आहे असे मला वाटते . तुमचे मत यापेक्षा भिन्न असू शकते ज्याचे मी स्वागतच करतो . भारतीय संस्कृतीत  अगदी ज्ञानवल्क स्मृतीपासून  विविध ग्रंथ आपल्याला असे सापडतील ज्यात दोन भिन्न विचारसरणी एकञ नांदत आहेत असो तर सांगायचा मुद्दा असा की एका अप्रगत अर्थव्यवस्थेतून बदलत्या अर्थव्यवस्थेचे भान भारताला ज्या घटनेमुळे  आले ती घटना आजपासून 28  वर्षापुर्वी म्हणजेच 1991 साली घडली . याच सुमारासच सेव्हीयत सोशालिस्ट रशिया चे साम्राज विसर्जीत झाले होते . आजच्या जगातील आठव्या क्रमांकाचा क्षेञफळाने मोठा असणारा कझागिस्तान हा देश व जगातील सगळ्यात मोठा रशिया यांच्यासह सध्याचा जगातील  जवळपास 11 देश त्या एका देशाचे भाग होते जो आर्थीक कारणाने फुटला.  विचारच करवत नाहीये मला जगातील किती मोठ्या भुभागावर परीणाम झाला असेल . 

               शाळेत आॉस्टेलीया नावाचे खंड असल्याचे शिकवले होते ज्या खंडातील जवळपास 80 ते85% भाग आॉस्टेलीया या देशाने व्यापला आहे माञ तरी तो देश जगातिल सर्वात मोठा देश नाहीये म्हणजे कल्पना करा किती मोठ्या भुभागावर आर्थिक  सुनामी आली होती . त्यावेळी .जर्मनीसुध्दा एकञ झाला . अश्या परीस्थीतीत भारताने अपरीहार्य परीस्थितीत स्विकारलेल्या या धोरणामुळेच आज जगात भारताला मान मिळत आहे असो या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?