जरी झाली आपणास जाउनी वर्षे 99

या वर्षी एक ऑगट रोजी येणारी  लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी अत्यंत विशेष असणार आहे . कारण त्या पुण्यतिथीपासून लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरण दिनाचे 100वे  वर्ष सुरु होईल . लोकमान्य टिळकांचे निधन 1 ऑगस्ट 1920 ला झाले होते . शंभर वर्ष हा फार मोठा कालखंड झाला . त्यामुळे या पुण्यतिथीचे महत्व अन्यनसाधारण असणार आहे . लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वतंत्रलढ्यात फार मोठे योगदान दिले होते . ऑनी बेझंट या आयरिश स्वतंत्रलढ्यात महत्तवाची भूमिका बजावणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकेबरोबर त्यांनी होमरूल  चळवळ  ही सुरु केली . त्यांनी  केसरी या वृत्तपत्राद्वारे सामाजात लढ्याची धार कायम तेवत ठेवली .त्यांच्या लेखनामुळे अनेकांना स्वतंत्रलढ्यात भाग घेण्यासाठी स्फूर्ती मिळाली . मुंबईमधील गिरणी कामगार बाबू गेनू घे त्यापैकी एक महत्वाचे नाव . .

त्यांनी पुण्यात अनेक संस्थांची उभारणी केली . ज्या मध्ये डेक्कन प्रोग्रेसिव्ह सोसयटी ही प्रमुख संस्था आहे . अनेक महत्वाच्या  महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवले . सर परशुरामभाऊ हे महाविद्यालय त्यापैकीच एक . त्यांनी फक्त  क्रांतिकारी विचारांना चालना दिली असे नव्हे , तर त्यांनी पुण्यात औद्योगिक विकासाला चालना देखील देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी ओगले वर्क्स नावाने पुण्यात काच निर्मितीचा कारखाना देखील काढला
           लोकमान्य टिळकांच्या कार्यकाळातील सुरवातीच्या काळात राष्ट्रीय सभेत मावळ विचारप्रणालीचे  प्राबल्य होते . टिळकांची विचारप्रणाली जहाल होती . त्यामुळे त्यांना एकाच वेळी मवाळविचार प्रणालीच्या स्वकीयांबरोबर जुलमी ब्रिटिश सत्तेबरोबर लढावे लागले . त्यांनी  सातत्याने या दोन विचार प्रणालीचा व्यक्तीच्या सवांद साधण्यासाठी प्रयत्न केला , जो आपणास 1916 च्या लखनौ अधिवेशनात फलद्रुप झालेले दिसते .
   लोकमान्य टिळकांनी ग्रंथ संपदादेखील रचली . आर्यांचे मुळस्थान ध्रुव होते हे सांगणारा आर्टिक होम ऑफ वेदाज आणि भागवत गीतेवरील गीतारहस्य हे त्यातील प्रमुख ग्रंथसंपदा
लोकमान्य टिळकांच्या काळात राष्ट्रीय सभेतील  लाला लाजपत राय , आणि बिपीनचंद्र पाल यांच्याबरोबर त्याचे सलोख्याचे संबंध होते यावरून त्यांना लाल बाल पाल असे ओळखेल जात असे
लोकमान्य टिळकांच्या कामाची चार सूत्रे होती , स्वदेशी ,  बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य . त्यातील स्वराज या सुत्रासांसाठी त्यांनी 1920 साली स्वतःचा पक्ष देखील काढला होता मात्र त्या पक्षाला  वाढवण्याच्या अगोदरच एक आजाराने त्यांचे 1920 च्या ऑगस्ट महिन्यात निधन झाले .
लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य या संकल्पनेत सुरवातीला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य आणि काळनंतरने पूर्ण स्वातंत्र्य अपेक्षित होते . लोकमान्य टिळकांचे कार्य एका ब्लॉग पोस्टचा विषय नाहीच तरी सध्यापुरते थांबतो ते पुन्हा येण्यासाठी तोपर्यंत नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?