वाचनाचे नव्या जगातील स्थान

            आज घरी टिव्ही बघत असताना एका ई बुक रिडर ची जाहीरात बघीतली आणी मनात विचार आला की वाचन ही संकल्पना किती बदलली आहे पुर्वी वाचन म्हटले की फक्त छापील मजकुर डोळ्यासमोर येत असे आता पुस्तक वाचन म्हणजे ईलेक्ट्रीक उपकरणाचा वापर करत केलेले वाचनच   समोर येते              पुस्तक ही संकल्पना पण सध्याचा काळात  किती बदलली आहे पुर्वी पुस्तके वाचली जायची आता पुस्तके वाचली जात नाही तर पुस्तके ऐकली जातात त्याला अॉडीयो बुक म्हणतात  श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दिसांमंजी काही तरी लिहावे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असे दासबोधात लिहले आहे. त्या काळात फक्त कागदावरची  पुस्तके होती  आणि तिही हाताने लिहलेली होती. छापलेली नसत. तरी त्यांनी वाचनाचे महत्व ओळखले होते                  

             छापलेली पुस्तके हातळण्यापेक्षा ई बुक हातळणे खुप सोईचे होते माझ्या स्वता:च्या मोबाईल मध्ये सुध्दा 8 ई बुक आहेत  .ऑडियो बुक ची तर गोष्ट च वेगळी ती एकदा  डाउनलोड केली की झाले तुम्ही ज्या उपकरणात ते डाउनलोड केले (त्याला ब्ल्युटुथ असली तर तर सोने पे सूहाणा  आणी तुयच्याकडे कानाच्या मागे ब्ल्युटुथ च्या मार्फत डेटा हस्तांतरण करणारे उपकरण असले की दुधात साखर  दोघांच्या संपर्क झाला की  एका बाजुला गाडी चालवत असताना सुध्दा  या उपकरणाच्या  साह्याने मोबाईलवर बोलता येते अश्या पध्दतीने मोबाईल वर बोलले तर मानेच्या विविध कसरती न करता मोबाईल वर बोलता येते आणि सध्या च्या काळात नाशकात तरी मानेच्या कसरती करत मोबाईलवर बोलले तरच पकडले जाते आणि पकडली जाते. ती चोरी अशे आपल्याकडे म्हटले जात असल्याने नाशकात हा कायदेभंग चालू शकतो ,असे माझे मत अहे मी माञ हे करत नाही याची नोंद घ्यावी ) 
       
         तंञज्ञानामुळे  ज्याप्रकारे पुर्वी घराघरात म्हणत त्याच धर्तीवर बोलायचे झाल्यास मोबाईल मोबाईल मध्ये वाचनालये आली आहेत ते पुस्तकांचे जतन करा ती फाटणार नाहीत वाळवी लागणार नाहीना त्यांना याची चिंता करत बसा त्यांचे तेल पाणी अश्या घटकांपासून रक्षण करा 
               सगळ्या कटकटी संपल्या ना या मुळे जर वाचनालयात  आपणास पाहीजे असणाऱ्या पुस्तकाच्या मर्यादित प्रती असल्या की ते  वाट बघत बसा या सगळ्या  कटकटीला सुट्टी आले मनात करा पुस्तक डाउनलोड (त्यातही मँकडोनाल्ड सारख्या काही वेळ फुकट वाय फाय देणार्या गोष्टीच्या जवळ  गेले तर इंटरनेटचे पैसै पण लागत नाही ) वाचून झाले की करा डिलीट कोण ते सांभाळयाचे कष्ट घेणार त्याला कव्हर वगैरे घालत वेळ वाया घालवणार ? सगळे कसे सुटसुटीत आणी छापील पुस्तके जाणार म्हणून रडण्याचे काही कारण नाही कारण मराठीतील एक ज्येष्ठ कवी  केशवसुत यांनी जून्या गोष्टीचा त्याग करण्यास त्यांचा कवीतेत सांगीतले आहेच  त्यांनीच सांगीतले आहे जुने ल्गू द्या मरणा लागूनी जाळूनि अथवा पुरुनी टाका  या ठिकाणी छापील पुस्तके म्हणजे त्या जून्या गोष्टी तरी जूने ते सोने या प्रमाणे छापील पुस्तकाबाबत अश्रु ढाळणे संयूक्तिक नाही असे माझे प्रामाणीक मत आहे  तरी काही अनंत फंदिचे वंशज धोपटमार्गाचा अवलंबन करण्याचा सल्ला विचारात घेउन बदल स्विकारणार नाहीत याची मला जाणीव आहेच बघू कोण जिंकते ? या विषयावर खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम
         तूम्ही  एका बाजुला दूसरे काम करत असताना सूध्दा पुस्तकाचा आस्वाद घेवू शकता आणि या प्रकारासाठी पण ई बुक प्रमाणे फारशी जागा लागत नाही. मी जेमतेम दिड जीबी जागेत किमान  साडे चारशे पानाचे  पुस्तक घेउन  फिरु शकतो ते पण माझ्या मोबाईल फोन मध्ये .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?